आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जागतिक जीडीपीत ३ टक्के घसरण शक्य, निम्म्या देशांनी आयएमएफकडे मदत मागितली
नवी दिल्ली कोरोना विषाणू महारोगराईमुळे या वर्षी आशियाचा आर्थिक विकास दर शून्य राहू शकतो. तसे झाल्यास ही गेल्या ६० वर्षांतील सर्वात खराब कामगिरी असेल. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)ने ही शक्यता व्यक्त केली आहे. यासोबत सांगितले की, उत्पादनाच्या संदर्भात अन्य क्षेत्रांच्या तुलनेत आशियात सध्या चांगली स्थिती आहे. तरीही या महारोगराईचा आशिया-प्रशांत क्षेत्रात गंभीर आणि अनपेक्षित परिणाम होईल. आयएमएफनुसार, आशियाचा आर्थिक विकास दर जागतिक वित्तीय संकटादरम्यान ४.७% व आशियाई वित्तीय संकटादरम्यान १.३% होता. शून्य विकास दर ६० वर्षांत सर्वात वाईट स्थिती असेल. दुसरीकडे, आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा म्हणाले, सदस्य देशांपैकी १०२ देशांनी मदत मागितली आहे. संकटग्रस्त देशांची मदतीची मागणी पूर्ण करण्यासाठी आयएमएफ कर्ज स्वरूपात १ लाख कोटी डॉलर(७६ लाख कोटी रु.)ची मदत देण्यासाठी वचनबद्ध आहे.
जागतिक जीडीपीमध्ये येऊ शकते ३% घसरण
आयएमएफ प्रमुखाने सांगितले की, हे संकट े याआधी कधीही पाहिले नाही. या महारोगराईमुळे जागतिक अर्थव्यवस्था १९३० दशकाच्या महामंदीनंतर मोठ्या संकटातून जात आहे. जागतिक जीडीपीत ३% घसरण येऊ शकते. तीन महिन्यांपूर्वी आमच्या सदस्य देशांपैकी १६० देशांमध्ये प्रती व्यक्तीच्या उत्पन्नात वाढ होईल,असे आकलन होते. मात्र, आता १७० देशांमध्ये प्रती व्यक्ती उत्पन्नात घसरणीची शक्यता आहे. ही इतिहासातील पहिलीच वेळ, जेव्हा आयएमएफच्या विस्तृत आर्थिक अंदाजात आपत्कालीन तज्ञांचे मत घेतले जात आहे. या तज्ञांनुसार, या विषाणूने दीर्घकाळापर्यंत प्रभाव दाखवल्यास व लस आणि औषधास विलंब झाल्यास स्थिती आणखी खराब होऊ शकते.
चीनचा विकास दर १.२% वर येण्याची शक्यता
आयएमएफनुसार, आशियातील दोन मोठे व्यापारी भागीदार अमेरिका आणि युरोपमध्ये अनुक्रमे ६% आणि ६.६% च्या घसरणीचा अंदाज आहे. या वर्षी चीनचा आर्थिक वृद्धी दरही २०१९ च्या तुलनेत ६.१% घटून १.२% येण्याची शक्यता आहे. आयएमएफने सांगितले की, कोरोनामुळे आशियातील उत्पादकतेत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. चीनने जागतिक वित्तीय संकटादरम्यान जीडीपीच्या ८% समान मदतीचे उपाय केले होते. यामुळे २००९ च्या जागतिक संकटावेळी चीनच्या विकास दरावर किरकोळ परिणामानंतर ९.४% राहिला होता.
जगात सर्वात तेजीने वृद्धी नोंदवेल भारत
आयएमएफ विकसित व विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेत वृद्धी नकारात्मक राहील. मात्र दोन देश- भारत व चीनमध्ये विकास दर सकारात्मक राहील. चीनच्या विकास दराचा अंदाज १.२% व भारताच्या विकास दराचा अंदाज सर्वात जास्त १.९% राहील. २०२१ मध्ये चीन ९.२% आणि भारत ७.४% च्या दराने विकास करू शकतो. आयएमएफच्या आशिया व प्रशांत विभागाचे संचालक चांग योंग री यांनी बुधवारी सांगितले की, आर्थिक मंदी असतानाही सरकारने देशव्यापी बंद लागू केला. आम्ही भारताचे समर्थन करतो. री म्हणाले, आम्ही या वर्षाच्या अखेरपर्यंत आर्थिक उत्पादनात वाढ येण्याची अपेक्षा करतो, कारण विषाणू पुन्हा डोके वर काढू शकतो आणि स्थिती सामान्य होण्यास आणखी वेळ लागू शकतो.
भारताच्या वृद्धीवरून वर्ल्ड बँक- आयएमएफचा अंदाज अति आशावादी : सुब्रमण्यम
अर्थ मंत्रालयाचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी सांगितले की, वर्ल्ड बँक आणि आयएमएफने भारताच्या जीडीपीच्या आकड्याबाबत जो अंदाज व्यक्त केला आहे तो खूप आशावादी आहे. कोरोना विषाणूचा फटका बसलेली अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देशाचे अतिरिक्त १० लाख कोटी रुपये खर्च करण्याची गरज असेल. आयएमएफने मंगळवारी आपल्या अंदाजात म्हटले की, २०२० मध्ये भारताची जीडीपी वृद्धी दर १.९% राहील. भारत या अंदाजानुसार विकास नोंदवत असेल. सुब्रमण्यम एका वेबिनारमध्ये बोलत होते.
अतिरिक्त १० लाख कोटी रु. खर्च केल्यास अर्थव्यवस्था रुळावर येऊ शकेल
त्यांनी सांगितले की, एका महिन्यात औद्योगिक उत्पादनात तेजीने घसरण नाेंदणार आहे. ज्याचा आधी अंदाज नव्हता, अशा उपायांवर आपल्याला २% खर्च करावा लागेल. औद्योगिक उत्पादनात झालेला नुकसानीचा एक तृतीयांश हिस्सा समान भरपाई केली तरी हे जीडीपी ३%च्या समान असेल. याच पद्धतीने आम्ही अर्थव्यवस्थेचा वेग रुळावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्यंाना मिळून अतिरिक्त १० लाख कोटी रु.(जीडीपीच्या ५% समान) खर्च करण्याची आवश्यकता असेल. सुब्रमण्यम यांनी अतिरिक्त खर्चासाठी येत्या एक वर्षात पैसा जमा करण्यावरून पाच िशफारशी केल्या आहेत. यामध्ये खर्चात कपात, थेट रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेण्याचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.