आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न- उत्तर:सध्या आयटी उद्योगाचा दृष्टिकोन कमजोर

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक महिंद्राचे शेअर १७५० आणि ७३०च्या भावाचे आहेत. ते होल्ड करू का? - हेमल शाह आयटी इंडस्ट्रीचा आउटलूक सध्या कमजोर आहे. तुम्ही जर शॉर्ट टर्मसाठी टेक महिंद्राचे शेअर विकत घेतले असेल तर बाहेर पडा.

ओएनजीसी, एलआयसी हाउसिंग, ग्लॅक्सो फार्मा, कोटक बँकेचे काय करू? आरके दीक्षित एलआयसी हाउसिंगमधून एचडीएफसी किंवा कून फिन होम्समध्ये स्विच करू शकता. एलआयसी हाउसिंगच्या कमाईत बराच चढ-उतार आहे. ओएनजीसीमधूनही बाहेर पडा, ग्लॅक्सो फार्मातून डिव्हिस लॅबमध्ये स्विच करू शकता. कोटक बँकेला होल्ड करू शकता.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर, ओरिएंट सिमेंटचे शेअर होल्ड करू की विकू? -आशीष दाहिया आयआरबी इन्फ्राला होल्ड करा. कॅपेक्स सायकलमध्ये तेजी आल्याने सिमेंट कंपन्यांना फायदा होईल. डीसीबी बँक, एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट, पाॅवर ग्रिड, कॅस्ट्रॉल इंडियाचे शेअर आहेत. ते होल्ड करू शकताे का ? - गोपाल शुक्ला डीसीबी बँकेतून आयसीआयसीआय बँक किंवा एचडीएफसी बँकेत स्विच करा. एचडीएफसी एएमसी चांगले स्टॉक आहे. कॅस्ट्रॉलमधून मारुती किंवा मदरसन वायरिंगमध्ये स्विच करू शकता.

मास्टेक, टाटा स्टील, एमफेसिस, व्हीआयपैकी कोणते होल्ड करू? - राजबब्बर सिंह राठवा मास्टेक, एमफेसिसला लाँग टर्मसाठी होल्ड करा. व्होडाफोन आयडियामधून भारती एअरटेलमध्ये स्विच करू शकता. टाटा स्टील लाँग टर्मसाठी चांगला स्टाॅक आहे.

त्रिवेणी टर्बाइन, एजीमायट्रिप, येस बँकेसाठी लाँग टर्मचे आउटलूक काय? - विवेक डागर अशोक लेलँड आणि देवयानीचे चांगले शेअर आहेत. प्रवास आणि पर्यटन इंडस्ट्रीत तेजीने इजमाय ट्रिपला फायदा होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...