आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पाइसजेटवर सायबर हल्ला:अनेक उड्डाणे उशीराने सुरू, गेल्या आठवड्यातही पेमेंट वादामुळे दिल्लीत थांबवली होती विमाने

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पाईसजेटच्या सिस्टमवर मंगळवारी 24 मे रोजी रात्री रॅन्समवेअरचा हल्ला झाला. यामुळे त्याच्या उड्डाणांशी संबंधित कामकाज मंदावले आणि पहाटेच्या अनेक उड्डाणांवर परिणाम झाला. एअरलाइन्सने बुधवारी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

स्पाइसजेटने सांगितले की, काल रात्री स्पाईसजेटच्या सिस्टमवर रॅन्समवेअरच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे आज सकाळी काही उड्डाणांना उशीर झाला. आमच्या आयटी टीमने परिस्थिती नियंत्रणात आणली असून त्यामध्ये आता सुधारणा झाली आहे. आता उड्डाणे सुरळीत सुरू आहेत.

स्पाइसजेटने ट्विट केले की काल रात्री त्यांच्या सिस्टमवर रॅन्समवेअरचा हल्ला झाला, त्यामुळे सकाळीची उड्डाणे उशीरा झाली. कंपनीच्या आयटी टीमने सिस्टिम सुरळीत केली आहे आणि आता उड्डाणे सामान्यपणे चालतील.
स्पाइसजेटने ट्विट केले की काल रात्री त्यांच्या सिस्टमवर रॅन्समवेअरचा हल्ला झाला, त्यामुळे सकाळीची उड्डाणे उशीरा झाली. कंपनीच्या आयटी टीमने सिस्टिम सुरळीत केली आहे आणि आता उड्डाणे सामान्यपणे चालतील.

स्पाईसजेटचे विमान गेल्या आठवड्यातही दिल्लीत थांबवले

मागच्या आठवड्यातही दिल्लीत स्पाईसजेटचे उड्डाण थांबवण्यात आले होते, त्यामागील विमान कंपनीने एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाचे पैसे न देणे हे कारण सांगितले जात होते. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडामुळे दैनंदिन पेमेंटला उशीर झाल्याचे एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितले होते. त्यानंतर ऑपरेशन नॉर्मल झाले. एएआयने 2020 मध्ये स्पाईसजेटला कॅश आणि कॅरी तत्त्वावर विमान चालवण्याची परवानगी दिली आहे, कारण एअरलाईन आपली जुनी थकबाकी वेळेवर भरू शकलेली नाही.

फ्लाइटमध्ये लवकरच ब्रॉडबँड सुरू करण्याचा दावा

काही दिवसांपूर्वी स्पाइसजेटने सांगितले होते की, लवकरच त्यांच्या विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, विमानचालन कंपनीच्या ताफ्यात 91 विमाने आहेत, ज्यात 13 मॅक्सप्लेन आणि 46 जुन्या आवृत्तीची बोईंग 737 विमाने आहेत.

क्रेडिट सुईस सोबतही वाद मिटला

स्पाइसजेटने बुधवारी सांगितले की त्यांनी स्विस-आधारित क्रेडिट सुईस सोबत सुरू असलेल्या वादात समझोता आणि कराराच्या अटींवर स्वाक्षरी केली आणि निष्कर्ष काढला आहे. एअरलाइनने एका निवेदनात म्हटले आहे की, 23 मे रोजी झालेल्या कराराच्या अटी आणि संमती अंतिम आदेशांसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.

स्पाईसजेटने अधिक तपशील दिलेला नाही, परंतु असे म्हटले की, त्यांनी एक विशिष्ट रक्कम आगाऊ देण्याची आणि सामंजस्यासाठी पूर्ण पैसे देण्यास परस्पर सहमती दर्शविली आहे. या प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांनी यापूर्वीच 5 दशलक्ष अमेरिकन डॉलरची बँक हमी दिली आहे आणि आता कंपनीचे कोणतेही आर्थिक दायित्व नाही, असे एअरलाइनने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...