आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताची सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक, एयु स्मॉल फायनान्स बँकेने आज क्रेडिट कार्ड उद्योगात आपले पहिले स्वाइपअप प्लॅटफॉर्म लाँच करण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून एयु बँक इतर बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना एयु क्रेडिट कार्डपैकी एकात अपग्रेड करण्याची संधी देईल. बँकेने २-३ सेकंदाच्या आत ग्राहकांच्या उपस्थित क्रेडिट कार्डच्या तुलना करण्यासाठी एक मंच प्रदान केले आहे. यानंतर काही मिनिटांतच (अँड-टू-अँड) डिजिटल प्रक्रियेच्या माध्यमातून क्रेडिट लिमिट, कॅशबॅक, रिवार्ड पॉइंट्स अपग्रेड करू शकतात. क्रेडिट कार्ड दोन दशकापासून बाजारात आहे. लोकांची जीवनशैली क्रेडिट कार्ड अर्ज सबमिट करताना सारखीच असते. अनेक बँका क्रेडिट मर्यादा वाढवण्याची ऑफर देतात परंतु तरीही सुविधा आणि फायदे अपरिवर्तित असतात. याचा अर्थ असा की, ग्राहक त्यांच्या सध्याच्या जीवनशैलीशी जुळत नसलेली क्रेडिट कार्ड वैशिष्ट्ये वापरत आहेत. एयू बँकेने ग्राहकांची ही गरज ओळखली आणि स्वाइपअप प्लॅटफॉर्मद्वारे ही गरज पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.