आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थव्यवस्था:शुभ संकेत : तिसऱ्या तिमाहीत जीडीपी विकास दर 0.4 टक्के

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाचा विकास दर २०२०-२१ च्या पहिल्या दोन तिमाहीत नकारात्मक राहिल्यानंतर सकारात्मक झोनमध्ये आला आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत विकास दर ०.४% राहिला. यासोबत भारत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये विकास दर सकारात्मक क्षेत्रात आलेला चीननंतरचा दुसरा देश ठरला आहे.

देशात विकास दर पहिल्या तिमाहीत उणे २३.९% आणि दुसऱ्या तिमाहीत उणे ७.५% होता. तिसऱ्या तिमाहीत जीडीपीचा(सकल राष्ट्रीय उत्पादन) आकार ३६.२२ लाख कोटी रुपयांचा राहिला. हा गेल्या वित्त वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या ३६.०८ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत ०.४% जास्त आहे. तिसऱ्या तिमाहीत वृद्धी दर शून्यावर आल्यानंतर चालू वित्त वर्षात वृद्धी दर उणे ८% राहील, असा सरकारचा अंदाज आहे. वित्त वर्ष २०१९-२० मध्ये आर्थिक विकास दर ४% होता. सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार, वित्त वर्ष २०२०-२१ मध्ये जीडीपी १३४.०९ लाख कोटी रुपये राहण्याचा अंदाज आहे. याच्या तुलनेत २०१९-२० मध्ये जीडीपीचा आकार १४५.६९ लाख कोटी रु. होता.

दरडोई उत्पन्न ८,६३७ रु. घटण्याची शक्यता
चालू वित्त वर्षादरम्यान देशात दरडोई उत्पन्न वार्षिक ८५,९२९ रु. राहण्याचा अंदाज आहे. हे गेल्या वित्त वर्षात ९४,५६६ रु. होते. म्हणजे, या वेळी ९.१% किंवा ८,६३७ रु. घटण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...