आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहन उद्योग:वाहन कंपन्यांसाठी मार्च संस्मरणीय; 505 टक्क्यांपर्यंत वाढली विक्री, मारुतीपासून ह्युंदाई, टाटा, महिंद्रा सर्वांच्या विक्रीत मोठी वाढ

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टॉप गिअरमध्ये विक्री महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या विक्रीत सर्वाधिक वाढ नोंदली

देशातील वाहन निर्मात्या कंपन्यांसाठी वित्त वर्ष २०२०-२१ चा अखेरचा महिना संस्मरणीय ठरला. या महिन्यात वाहन कंपन्या विशेषत: कारच्या विक्रीत ५०५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या विक्रीतही सर्वात जास्त वाढ पाहायला मिळाली. मारुती सुझुकी इंडिया आणि ह्युंदाई मोटर इंडियानेही गेल्या मार्चच्या तुलनेत जवळपास दुप्पट विक्री केली. दुचाकी वाहनांच्या विक्रीतही मार्चमध्ये मोठी उसळी दिसली. देशातील दुसरी सर्वात मोठी दुचाकी कंपनी होंडा टू-व्हीलर्सच्या विक्रीत ६०.७७ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. जाणकारांनुसार, गेल्या मार्चच्या अखेरच्या आठवड्यात लॉकडाऊन लागले होते. यामुळे त्या महिन्यात ठोक विक्रीत घट आली होती. मात्र, ही घट एवढी जास्तही नव्हती. ऑटो डीलर्सनुसार, गेल्या महिन्यांत वाहनांची विक्री वाढण्यामागे एक कारण हेही होते की, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ३१ मार्च एलटीसीचा (लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन) फायदा उचलण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अशा हजारो कर्मचाऱ्यांनी कार खरेदी केली. मार्चमध्ये महिंद्रा अँड महिंद्राने एकूण ४०,४०३ वाहनांची विक्री केली. याच्या तुलनेत मार्च २०२० मध्ये कंपनीने केवळ ६,६७९ वाहने विकली होती.

या हिशेबाने मार्च २०२१ मध्ये कंपनीची विक्री ५०४.९२ टक्के वाढली. कंपनीने गेल्या महिन्यात १६,७०० प्रवासी वाहनांची विक्री झाली, मार्च २०२० मध्ये केवळ ३,३८३ वाहने विकली होती. या प्रकरणात ३९३ टक्के वाढ नोंदली. मार्चमध्ये टाटा मोटर्सने एकूण ६६,६०९ वाहनांची विक्री केली. याच्या तुलनेत मार्च २०२० मध्ये कंपनीने केवळ ११,०१२ वाहने विकली. या हिशेबाने मार्च २०२१ मध्ये कंपनीची विक्री ५०४.८७ वाहने विकली होती. कंपनीने गेल्या महिन्यात २९,६५४ प्रवासी वाहनांची विक्री केली. मार्च २०२० मध्ये केवळ ५,६७६ वाहने विकले होते. या प्रकरणात ४२२.४४ टक्के वाढ नोंदली होती. देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने मार्चमध्ये एकूण १,६७,०१४ वाहनांची विक्री केली. कंपनीने मार्चमध्ये ८३,७९२ वाहने विकली होती. कंपनीची विक्री ९९.३२% वाढली आहे. याच पद्धतीने ह्युंदाईची विक्री मार्चमध्ये १०० %वाढली. गेल्या महिन्यात ६४,६२१ वाहने विकली. गेल्या मार्चमध्ये ३२,२७९ वाहनांची विक्री झाली. मार्चमध्ये होंडा टू-व्हीलर्सची विक्री वार्षिक आधारावर ६०.७७ टक्के वाढून ३,९५,०३७ वाहने राहिली.

प्रमुख दुचाकींची विक्री
कंपनी मार्च-21 मार्च-20 फरक
होंडा टू-व्हीलर्स 4,11,037 245,716 67%
टीव्हीएस 3,07,437 1,33,988 129%
रॉयल एन्फील्ड 66,058 35,814 84%

प्रमुख कार कंपन्यांची विक्री
कंपनी मार्च-21 मार्च-20 अंतर
मारुती सुझुकी 167,014 83,792 99%
ह्युंदाई 64,621 32,279 100%
टाटा मोटर्स 29,654 5,676 422%
एमअँडएम 16700 3383 393%
टोयोटा 15,001 7,023 113%

प्रवासी वाहन श्रेणीत गेल्या नऊ महिन्यांत सर्वाधिक विक्री केली

  • मार्चमध्ये पर्सनल व्हेइकलची मोठी मागणी झाली. अद्यापही बोलेरोपासून स्कॉर्पिअोपर्यंत एसयूव्हीच्या सर्व मॉडेल्ससाठी बुकिंगची चांगली आहे. - विजय नाकरा, सीईओ (ऑटोमोटिव्ह विभाग), महिंद्रा अँड महिंद्रा
  • चौथ्या तिमाहीत प्रवासी वाहन उद्योगाने मोठी वाढ पाहिली. खासगी वाहनांच्या मागणीत मोठी वाढ दिसली. आम्ही नवे मॉडेलही लाँच केले . मार्चमध्ये या श्रेणीत नऊ महिन्यांत सर्वात जास्त विक्री झाली. - शैलेश चंद्रा, अध्यक्ष(प्रवासी वाहन)टाटा मोटर्स

बातम्या आणखी आहेत...