आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​मारुतीची ऑफरोडर जिम्नी लॉंच:4 व्हील ड्राईव्ह, 5 डोअर व्हर्जन, प्रीमियम SUV फ्रॉन्क्समध्ये उपलब्ध होईल; 11 हजारात बुकिंग सुरू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मारुती सुझुकीने ऑटो एक्सपोच्या दुसऱ्या दिवशी आपली ऑफ रोडर SUV जिम्नी लॉंच केली आहे. जिम्नी अनेक वर्षांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात आहे. गत पाच वर्षांपासून मारुती भारतात वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये जिम्नी सादर करित आहे. पण अखेर 2023 मध्ये त्याला लॉचिंगसाठी वेळ मिळाला. जिम्नीचे 4 व्हील ड्राइव्ह आणि 5 डोअर व्हर्जन भारतात आणले आहे.

या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जिम्नी रस्त्यावर दिसणार असल्याचे मारुती कंपनीच्या वतीने सांगण्यात आले. याचा अर्थ कंपनीने एसयूव्हीच्या निर्मितीसाठी पूर्ण तयारी केली आहे. ही ऑफ रोडर कार 1.5 लीटर, 4 सिलेंडर K-15-B पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित असेल. हे 6,000 RPM वर 101 BHP पॉवर आणि 4,000 RPM वर 130 NM टॉर्क जनरेट करेल. कारला 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.

जिम्नी ऑफ रोडर कारला 1.5 लीटर, 4 सिलेंडर K15B पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.
जिम्नी ऑफ रोडर कारला 1.5 लीटर, 4 सिलेंडर K15B पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे.

विविध फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, मारुतीने गुरूवारी लॉन्च केलेल्या एसयूव्हीमध्ये वॉशरसह ऑटो एलईडी हेडलॅम्प दिले आहेत. तसेच, त्याला अत्याधुनिक मनोरंजन प्रणाली मिळेल. कंपनीने सुरुवातीला सात रंगांमध्ये जिम्नी सादर केली.

मारुतीने प्रीमियम SUV Franks देखील लॉंच केली

मारुती सुझुकीने आपली प्रीमियम SUV Franks देखील लॉन्च केली आहे. तरुणाईला लक्षात घेऊन याला 1.2 लिटर पेट्रोल इंजिनसह सादर करण्यात आले आहे. यामध्ये दिलेले फिचर्स हे लाईफस्टाईल ग्राहकांसाठी आदर्श बनवल्याचा कंपनीचा दावा आहे. विशेष म्हणजे दोन्ही गाड्यांचे बुकिंगही सुरू झाले आहे. मारुती त्यांची प्रीमियम डीलरशिप Nexa द्वारे विक्री करेल.

ऑटो एक्स्पो-2023 'द मोटर शो' चा आज म्हणजेच गुरुवारी दुसरा दिवस आहे. या प्रदर्शनात आज मारूती आपली 5 डोअर SUV जिम्नी सादर करू शकते. त्याचवेळी एमजी कंपनी देखील आपली विविध वाहनांचे मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे.

तसेच आयईसुजू, अल्ट्राव्हायोलेट, ज्युपिटर आणि बेनेली सारख्या कंपन्या देखील त्यांची वाहने सादर करणार आहेत. एक्स्पोचा पहिला दिवस हा प्रामुख्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठी समर्पित होता. येथे सर्व कंपन्यांनी मिळून 59 वाहनांचे सादरीकरण केले.

पहिल्या दिवशी, Tata Curve इलेक्ट्रिक एक्सक्लुझिव्ह SUV लॉन्च करण्यात आली.
पहिल्या दिवशी, Tata Curve इलेक्ट्रिक एक्सक्लुझिव्ह SUV लॉन्च करण्यात आली.

13 ते 18 जानेवारी दरम्यान सर्वसामान्यांसाठी प्रवेश
ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्ट येथे ऑटो एक्सपो मोटर शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याला 'द मोटर शो' असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये 11 आणि 12 जानेवारी हे दिवस माध्यमांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. 13 ते 18 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या एक्स्पोला सर्वसामान्य नागरिक भेट देऊ शकतील. वेळ सकाळी 11 ते रात्री 8 अशी असेल.

अनेक मोठे वाहन निर्माते सहभागी नाहीत
यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा, स्कोडा, फोक्सवॅगन आणि निसान यांच्यासह मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडी या लक्झरी वाहन कंपन्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या नाहीत. याशिवाय, Hero MotoCorp, Bajaj Auto आणि TVS मोटर कंपनी या प्रमुख दुचाकी कंपन्यांची उपस्थिती इथेनॉल पॅव्हेलियनमध्ये त्यांच्या 'फ्लेक्स फ्युएल' प्रोटोटाइप वाहनांच्या प्रदर्शनापुरती मर्यादित आहे.

कार्यक्रमांची रुपरेषा

आज मारुती ते एमजी पर्यंतची वाहने सादर केली जाणार

  • SML Isuzu त्यांची वाहने दुपारी 2 वाजता लॉन्च करणार आहे
  • ओमेगा मोबिलिटी दुपारी 02:25 वाजता वाहने दाखवेल
  • ज्युपिटर इलेक्ट्रिक मोबिलिटी हे वाहन 02:50 वाजता लॉन्च करेल
  • वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन आणि मोबिलिटी दुपारी 03.30 वाजता वाहने दाखवतील
  • MTA ई-मोबिलिटी 03:40 वाजता त्यांची वाहने सादर करेल
  • Motovolt Mobility 04:05 PM ला नवीन वाहने लाँच करेल
  • गोदावरी इलेक्ट्रिक 04:30 वाजता आपली वाहने दाखवेल
  • बेनेली-किवे त्यांची नवीन वाहने 4:55 वाजता लॉन्च करेल.
  • अल्ट्रा व्हायोलेट 05:20 वाजता त्यांची वाहने दाखवेल

पहिल्या दिवसातील प्रदर्शनातील वृत्त जाण्यासाठी खालील स्टोरी वाचा

टाटा सिएराचे 22 वर्षांनंतर इलेक्ट्रिक व्हर्जन : शाहरुखने लॉंच केली Hyundai Ioniq-5 EV

आशियातील सर्वात मोठ्या ऑटो एक्स्पोला बुधवारी दिल्लीत सुरुवात झाली. त्याच्या 16व्या आवृत्तीला 'द मोटर शो' असे नाव देण्यात आले आहे. संध्याकाळचा शोस्टॉपर टाटा सिएरा ईव्ही संकल्पना होती, जी कंपनीने 20 वर्षांनंतर परत आणली आहे. कंपनीने हे 3 डोर मॉडेल 1991 मध्ये लाँच केले आणि 2000 मध्ये त्याचे उत्पादन बंद केले. - येथे वाचा संपूर्ण बातमी

ऑटो एक्स्पोत 30 हून अधिक ईव्ही कंपन्या : हीरो-होंडा-बजाजसारखे मोठे नाही

दिल्लीत 13 जानेवारीपासून ऑटो एक्स्पो 2023 सुरू होत आहे. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पो मार्ट आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात इलेक्ट्रिक वाहनांचा सर्वाधिक बोलबाला असेल. यामध्ये 30 हून अधिक इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्या आणि स्टार्टअपचा समावेश असेल. - येथे सविस्तर बातमी वाचा

ऑटो एक्सपोमध्ये दिसेल मारुतीची पहिली EV:'टाटा पंच' EV वरूनही पडदा हटण्याची शक्यता

ऑटो एक्स्पो-2023 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. 13 जानेवारीपासून दिल्लीत या एक्स्पोची सुरूवात झाली. ग्रेटर नोएडा येथील जेपी गोल्फ कोर्सजवळील इंडिया एक्स्पो मार्ट येथे हे प्रदर्शन सुरू आहे. विविध कार्सबद्दल जाणून घेण्यासाठी - येथे सविस्तर बातमी वाचा

बातम्या आणखी आहेत...