आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात ग्राहकांचा खर्च झपाट्याने वाढत आहे. बँकांकडून किरकोळ कर्जाची जोरदार मागणी हे त्याचे द्योतक आहे. आयडीबीआय कॅपिटलच्या एका अहवालानुसार, जानेवारीत बँकांचे किरकोळ कर्ज बुक ३९.५९ लाख कोटी रुपये झाला आहे. हा जानेवारी २०२२ मध्ये ३२.८७ लाख कोटीपेक्षा २०.४% जास्त आहे. जानेवारीत ग्राहक टिकाऊ कर्जाची मागणी सर्वात जास्त ४३.६% वाढली. या दरम्यान बँकांचे ग्राहक टिकाऊ कर्ज बुक ३६,९०० कोटी रुपये झाले. वर्षभरापूर्वी हा आकडा २५,७०० कोटी इतका होता. २०२३ च्या पहिल्या महिन्यात गृहनिर्माण कर्जाची मागणी १५.४% ने वाढून १८.८८ लाख कोटी रुपये झाली. दरम्यान, बँकांकडून घेतलेल्या एकूण कर्जात १६.७% वाढ झाली आहे.
देशात वाढतोय ईझीमनीचा कल बँकिंग तज्ञ सुलोचना देसाई यांच्या मते, जानेवारीत क्रेडिट कार्डच्या थकीत रकमेत २९.६% ची वाढ धक्कादायक आहे. याचाच अर्थ इझी मनीचा ट्रेंड देशात झपाट्याने वाढत आहे. म्हणजेच किरकोळ गरजांसाठीही लोक कर्ज घेत आहेत.
एकूण किरकोळ कर्जाची मागणी २०%पेक्षा जास्त
मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
कर्जाची मागणी वाढल्याने बँकांकडे रोकड घटली. बँक ऑफ बडोदानुसार, ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षात मागणीपेक्षा निधीचा पुरवठा सुमारे ४ लाख कोटी रुपयांनी कमी आहे. यापूर्वी सलग तीन आर्थिक वर्षे बँकांकडे मागणीपेक्षा जास्त रोकड होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.