आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसयूव्हीच्या यशानंतर सर्वाधिक ऑटोमोबाइल कंपन्यांचा फोकस सेडानवर शिफ्ट झाला आहे. ह्यंुदाई, होंडा, टाटा मोटर्स, टोयोटा आणि स्कोडासारख्या कंपन्यांचा यात समावेश आहे. याचे सर्वात मोठे कारण मागील वर्षांच्या तुलनेत यंदा सेडानची विक्री सुमारे ३५% वाढून ४.७४ लाखापर्यंत पोहोचू शकते. कोणत्याही इतर विभागाच्या कारमध्ये वाढीचा अंदाज नाही. होन्डा कार्स इंडिया नव्या पद्धतीने लाँच सिटी कारवर मोठा डाव लावत आहे. नव्या वेरनाची जोरदार विक्री होऊ शकते, असे हुंदाईला वाटतेय. दरम्यान टोयोटा किर्लोस्करने नवी सेडान बेल्टा लाँच केली आहे. लंडनची फर्म झॅटो डायनामिक्सच्या मते, याची किमत १० लाख रुपयापेक्षा जास्त असू शकते. चीनीची ईव्ही कंपनी बीवायडी भारतीय बाजारात या वर्षी ऑक्टोबरमध्य सील सेडॉन आणण्याची तयारी करत आहे.
या कारणांमुळे सेडानवर वाढला फोकस 4.33 लाख सेडानची विक्री २०२२ मध्ये, कारच्या एकूण विक्रीत यांचा वाटा ११.३% राहिला 4.74 लाख सेडान यंदा विकू शकते, एकूण कार विक्रीत वाटा १२% होईल. 3.20 लाख एकूण विक्रीच्या तीन चतुर्थांश वाटा असलेल्या एंट्री लेव्हलवर सेडाॅनची विक्री केली जाईल.
काही वर्षांत घटली सेडानची विक्री { 2014-15 दरम्यान भारतीय कार बाजारात सेडानचा वाटा २४.२% होता { 2022-23 मध्ये एकूण कार विक्रीत सेडानचा वाटा घटून १०.५% राहिला. { 2015-16 मध्ये सेडानची विक्री ६.३५ लाखाच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती. (स्रोत: जैटो डायनेमिक्स, फाडा, कार कंपनियां)
कल उलटण्याचा संकेत एसअँडपी ऑटोमोटिव्हजचे गौरव वंगाल यांनी सांगितले, भारतीयांना खडबडीत रस्त्यावरही उत्तम ड्रायव्हिंगचा अनुभव हवा आहे. एसयूव्हीचा ग्राउंड क्लिअरन्स सेडानपेक्षा जास्त असतो. तसेच, अलीकडच्या वर्षांत सेडान विभागात फार कमी नवीन कार लाँच झाल्या आहेत.
सेडानची विक्री दुप्पट होण्याची शक्यता टाटा मोटर्सच्या मते, यावर्षी आतापर्यंत सेडान कारांची विक्री गेल्या वर्षांच्या तुलनेत ८६% वाढली. होंडाची एंट्री-लेव्हल सेडाॅन अमेजची विक्री सुमारे ३८%, तर सिटीची विक्री ३२% वाढली. हुंदाईचा अंदाज यंदा त्यांच्या सेडान मॉडल्सची विक्री २०२२च्या तुलनेत दुप्पट झाली.
मार्चमध्ये कार विक्रीत झाली १४% वाढ मार्चमध्ये किरकोळ विक्री १४% वाढून ३,३५,२६६ पर्यंत पोहोचली. वाहन डिलर्सचे संघटन फाडाच्या मते, दरम्यान दुचाकीची विक्री १२% वाढली. व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत फक्त १०% वाढ झाली, तर तीनचाकी वाहनांची विक्री ६९% वाढली. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या संपूर्ण कालावधीत कार विक्री २३%.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.