आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विम्याची गोष्ट:आयुर्विम्याशी संबंधित 5 गैरसमजांपासून दूर राहा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विमा हा भविष्यातील जोखमींपासून संरक्षणाचा प्रभावी मार्ग आहे. मात्र विमा विशेषत: आयुर्विम्याबाबत (लाइफ इन्शुरन्स) बहुतांश लोकांमध्ये अनेक गैरसमज असतात. येथे अशा ५ गैरसमजांबात आम्ही सांगत आहोत-

1. जास्त वय किंवा आजार असल्याने मी विम्यासाठी पात्र नाही तथ्यः वय जास्त आणि एखादा आजार असला तरी विमा काढता येतो. तुम्हाला फक्त विमा काढणाऱ्याला याची माहिती द्यावी लागेल. वय जास्त आणि आजार असल्यास विमा कंपन्या जास्त जोखीम कव्हर करण्यासाठी प्रीमियम वाढवू शकतात.

2. आयुर्विम्याच्या तुलनेत अन्य ठिकाणी गुंतवणुकीने चांगला परतावा मिळेल. तथ्यः विमा ही गुंतवणूक नाही. हा तुमच्या कुटुंबाला भविष्यातील जोखमींत संरक्षण देण्याचा मार्ग आहे. याची तुलना गुंतवणुकीच्या साधनांशी होऊ शकत नाही. आयुर्विमा उत्पदनांत मृत्यूशी संबंधित जोखीम, मॉर्बिडिटी रिस्क, लॉन्गेविटी रिस्क, गॅरंटेड रिटर्न, मार्केट-लिंक्ड रिटर्न, व्होल लाइफ कव्हरसारखे फीचर्स असतात जे गुंतवणुकीच्या साधनांत नसतात.

3. यूलिप योग्य पर्याय नसतात. तथ्यः नव्या पिढीचे यूलीप खूप कमी शुल्कात येतात. यातील अनेक तर पॉलिसीच्या काळात कापून घेतलेल्या मॉर्टिलिटी/ अन्य शुल्क रिफंडही करतात.

4. केवळ खरेदी करणाऱ्याच्या नावाने पॉलिसी घेता येते. तथ्यः नियमित उत्पन्न असलेली कोणतीही व्यक्ती जिचे वय १८ पेक्षा अधिक आहे, ती आपल्या किंवा आपल्या जोडीदाराच्या किंवा मुलांच्या नावे पॉलिसी घेऊ शकतो.

5. क्लेम सेटलमेंटमध्ये अडचण असते, विमा कंपनी रक्कम देण्यास नकार देते तथ्यः ग्राहकांनी दिलेल्या माहितीवरच विमा पॉलिसी वैध ठरते. जर काही लपवले असेल तर क्लेम मिळत नाही.

विशाखा आर. एम., एम. डी. आणि सीईओ, इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी

बातम्या आणखी आहेत...