आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाल-जवाब:रिस्कमुळे लहान शेअरमधील गुंतवणूक टाळा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारती एअरटेलचे शेअर घ्यायचे आहेत.कोणत्या प्राइससाठी सल्ला द्याल - तुलसी तन्खा खरेदी करायच्या शेअरच्या निम्मे शेअर सध्याच्या प्राइसमध्ये घ्या. घसरण झाल्यास ८०० रुपयांवर आणखी खरेदी करा. आलोक इंडस्ट्रीज, जीटीएल, इव्हेक्सिया लाईफ केयर, गोएंका डायमंड, विकास लाइफ केयरच्या शेअरमध्ये घाटा आहे काय करावे ? - अशोक कुमार

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक टाळावी. कारण त्यात जोखीम आहे. बहुतांश गुंतवणूकदारांची फसगत होते. आलोक इंडस्ट्रीज व विकास लाइफकेयरला शॉर्ट टर्मसाठी होल्ड करू शकता. बाकीबद्दल काही सांगू इच्छित नाहीत.

माझा पोर्टफोलिआे पाहून कशात होल्ड करावे, काय बदल करावा? कोणती खरेदी टाळावी? टार्गेट काय असावे?हे सांगा - राहुल जैन नायका व नजाराला तुम्ही होल्ड करू शकता. परंतु त्यांची भागीदारी पूर्ण पोर्टफोलियोच्या ५ टक्के असावी. इन्फोसिस लाँग टर्मसाठी चांगला शेअर आहे. तुम्ही स्टील अथॉरिटीतून बाहेर पडू शकता. मारुति , टाटा मोटर्सला होल्ड करू शकता. परंतु पोर्टफोलिआेमधील त्यांची भागीदारी देखील १५ टक्के ठेवा. एसबीआय कार्डमधून स्वीच व्हा असा सल्ला आहे. येस बँकेला होल्ड करण्यात रिस्क दिसते.परंतु तूर्त त्याला ठेवू शकता. लॉक-इन पिरिय मार्च २०२३ मध्ये समाप्त होईल.

मी न्यूरेकामध्ये गुंतवणूक केली आहे. पण त्याची घसरण होतेय. का करावे? - राजेश काेविडनंतर डिमांड कमी झाल्याने न्यूरेका शेअरची घसरण झाली. म्हणून यातून बाहेर पडावे, असा सल्ला आहे. माझ्याकडे ग्रीव्ह्स कॉटनचे शेअर आहेत. पण नुकसान होतेय. काय करू? - निशांत तंवर भाव वाढताच तुम्ही शेअरमधून बाहेर पडू शकता. मदर्सन सुमी वायरिंग वा ट्युब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडियात गुंतवणूक फायद्याची.

स्नेहा पोद्दार, एव्हीपी रिसर्च, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस

बातम्या आणखी आहेत...