आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणुकीचा मंत्र:चढत्या बाजारामध्ये नफा वसूली टाळा, पैशांची गरज असेल तरच विका शेअर

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात सेन्सेक्स प्रथमच ६३,००० व्या वर बंद झाला. अमेरिका व युरोपसारख्या मोठ्या व विकसित अर्थव्यवस्था सुस्त असतानाच असे झाले आहे. यामुळे जगभरातील बहुतांश शेअर बाजार विक्रीच्या दबावाखाली आहेत. मात्र, बहुतांश भारतीय गुंतवणूकदार चांगला नफा मिळवत आहेत. खास करून ज्यांनी लॉकडाऊन काळात शेअर खरेदी केले होते. असे लोके गोंधळलेले असतात. जागतिक अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिघडल्यास काही बाजारांत अधिक तेजीनंतर घसरण सुरू होऊ नये, याची त्यांना भीती असते. खरे म्हणजे सामान्य भारतीय गुंतवणूकदार कोसळणाऱ्या बाजारापेक्षा चढत्या बाजाराबाबत साशंक असतात आणि इथेच चूक करतात. अशा काळात नफा वसूली सामान्य ट्रेंड आहे, पण हा विचार बदलण्याची आवश्यकता आहे.

बाजाराचा अचूक अंदाज लावणे अशक्य, प्रयत्न वाया बाजारात तेजी आल्यावर नफा वसूली सामान्यत: बाजार कोसळल्यावर खरेदीच्या विचारासोबतच केली जाते. मात्र, कमी दराने शेअर खरेदी करणे व उच्च दराने विकणे व्यवहारिकदृष्ट्या सर्वात चांगले धोरण नसते. याचे कारण म्हणजे बाजार कधी उसळी घेईल व कोणत्या पातळीने कोसळणे सुरू होईल, याचा तुम्ही अचूक अंदाज लावू शकत नाही.

रियल इस्टेट गुंतवणूकदार करतात तसा विचार करा शेअर बाजारात पैसा लावणाऱ्यांनी रिअल इस्टेटच्या गुंतवणूकदारांसारखा विचार केला पाहिजे. प्लॉट, घर किंवा कमर्शिअल प्रॉपर्टीचे गुंतवणूकदार किमतींत रोज बदलाची चिंता करत नाहीत. वास्तविक रिअल इस्टेटद्वारे कमाई करणारे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात. शेअर बाजाराचे स्वरूपही वेगळे नाही. लक्षात ठेवा, १९७९ मध्ये सेन्सेक्स १०० वर होता.

तेजी-घसरण वर नाही, दर्जावर फोकस करा बाजार कोणत्याही वळणावर असो, तुमच्या क्वालिटी शेअर्सची ओळख करण्याची गरज असते. मग गुंतवणूक कायम ठेवा व पोर्टफोलियोची समीक्षा करत राहा. जसे प्रॉपर्टीच्या बाबतीत करता तसेच. तुम्ही चुकीचे लोकेशन किंवा कमजोर इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करत नाही.

तीन स्थितींत नफा वसूली करू नये

1. केवळ यासाठी की तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्सच्या किमती वाढल्या. 2. शेअरमध्ये तेजी असली तरी कंपनीचा व्यवसाय वाढल्यास. 3. पोर्टफोलियो डायव्हर्सिफाइड असेल, तर रिबॅलन्सिंगची गरज नाही.

दो िस्थतींत नफा वसूली करा

1. पैशांची गरज असेल वा पैसा मिळवण्याच्या अन्य पद्धती खूप महाग असल्यास. 2. उद्दिष्ट साध्य झाल्यास. जसे घर खरेदीलायक कमाई झाली असेल तर.

बातम्या आणखी आहेत...