आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Axis Bank Has Changed Interest Rates On Fixed Deposits I Latest News And Update 

अ‌ॅक्सिस बॅंकेतील ठेवीवर नवीनतम व्याजदर:बँकेने मुदत ठेवींचे व्याजदर बदलले, 5.75% पर्यंत केली वाढ

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अ‌ॅक्सिस बँकेने मुदत ठेवींवर (एफडी) व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. अॅक्सिस बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 7 सप्टेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.

2.50% ते 5.75% पर्यंत मिळेल व्याज
आता तुम्हाला अ‌ॅक्सिस बँकेत एफडी केल्यावर 2.50% ते 5.75% व्याज मिळेल. RBI ने गेल्या महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 50 बेस पॉइंट्स (bps) ने वाढ केली होती. यामुळे अ‌ॅक्सिस बॅंकेने एफडीवरील व्याजदरात सुधारणा केली आहे.

Axis Bank मधील FD वर किती व्याज मिळत आहे

कालावधीव्याज दर (%)
7 ते 29 दिवस2.50
30 ते 3 महिन्यापर्यंत3.00
3 ते 6 महिन्यापर्यंत3.50
6 महिने ते 7 महिन्यापर्यंत4.65
7 ते 8 महिन्यापर्यंत4.40
8 ते 9 महिन्यापर्यंत4.65
9 महिने ते 1 वर्षापर्यंत4.75
1 वर्ष ते 1 वर्ष 11 महिन्यापर्यंत5.45
1 वर्ष 11 महिने ते 1 साल 25 दिवसापर्यंत5.75
1 वर्ष 25 दिवस ते 2 वर्षापर्यंत5.60
2 वर्ष ते 5 वर्षापर्यंत5.70
5 वर्षे ते 10 वर्षापर्यंत5.75

या बँकांनी देखील एफडीवरील व्याजदरात वाढ केली
अ‌ॅक्सिस बँकेच्या आधी, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी, इंडियन बँक, एसबीआय, पीएनबी आणि आयसीआयसीआयसह अनेक बँकांनी एफडीवर व्याजदर वाढवले ​​होते. या सर्व बॅंकानी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरातही वाढ केली आहे.

FD मधून मिळणाऱ्या व्याजावरही कर भरावा लागतो
एखाद्या आर्थिक वर्षात बँक एफडीवर मिळणारे व्याज 40 हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही. ही मर्यादा 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांसाठी आहे. त्याचवेळी, 60 वर्षांवरील, म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीमधून 50 हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. यापेक्षा जास्त उत्पन्नावर 10% TDS कापला जातो.

5 वर्षांच्या FD वर कर सूट मिळते
5 वर्षांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला आयकर सूट देखील मिळते. तुम्हाला व्याजावर तसेच त्यात जमा केलेल्या मूळ रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, कोणत्याही एका आर्थिक वर्षात तुमच्या FD वर मिळालेले व्याज रु. 10,000 पेक्षा जास्त असल्यास, 10% दराने TDS कापला जाईल.

बातम्या आणखी आहेत...