आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Ban On Export Of Broken Rice Imposed By Central Government I Latest News And Update

केंद्रशासनाने घातली तांदूळाच्या निर्यातीवर बंदी:नियोजित निर्यातीला 15 सप्टेंबरपर्यंत मुबा; पाऊस न झाल्याने भातक्षेत्र घटले, टंचाईचा धोका

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशांतर्गत तांदूळाची उपलब्धता वाढविण्यासाठी सरकारने तुकडा तांदूळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. विदेशी व्यापार महानिर्देशालयाच्या वतीने याबाबत नुकतेच अधिसूचना जाहीर केली. तर 9 सप्टेंबर पासून हा नियम लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, पुर्वी ज्यांनी तांदूळ निर्यातीचे नियोजन केलेले आहे. अशा व्यापाऱ्यांना मात्र, या नवीन नियमातून 15 सप्टेंबर पर्यंत मुबा देण्यात आलेली आहे. ते 15 सप्टेंबरपर्यंत तांदूळ पाठवू शकतात. दरम्यान, बिगर बासमती तांदूळाच्या निर्यातीवर 20 टक्के सीमाशुल्क लागू झाल्यानंतर हा निर्णय शासनाने घेतला आहे.

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) यांच्या वतीने 8 सप्टेंबर रोजी जाहीर केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, " तुकडा तांदूळाच्या निर्यातीची श्रेणी 'मुक्त' वरून 'प्रतिबंधित' करण्यात आली आहे. हा नियम 9 सप्टेंबरपासून हा नियम लागू होईल. निर्यात धोरणाच्या संदर्भात विदेशी व्यापार धोरण 2015-2020 अंतर्गत करण्यात आलेल्या तरतुदी या अधिसूचनेला लागू होणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे. तसेच, 9 ते 15 सप्टेंबर या कालावधीत तांदूळाच्या काही मालाची निर्यात करण्यात परवानगी दिली जाणार आहे. या कालावधीत ज्यांच्या शिपमेंट्स या अधिसूचनेपूर्वी जहाजांवर सुरू झाल्या आहेत. अशाच खेपांना निर्यातीसाठी परवानगी दिली जाणार आहे.

बिगर बासमती तांदूळावर 20 टक्के निर्यात शुल्काची आकारणी

सरकारने उसना तांदूळ वगळता बिगर बासमती तांदळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावले होते. चालू खरीप हंगामात भात पिकाखालील क्षेत्रात लक्षणीय घट झाली आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. महसूल विभागाने गुरुवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार तांदूळ आणि तपकीरी तांदूळावर 20 टक्के निर्यात शुल्क लावण्यात आले आहे. हे निर्यात शुल्क 9 सप्टेंबरपासून लागू होणार आहे

कमी पावसामुळे भातशेतीचे क्षेत्र घटले, म्हणून घेतला निर्णय

तुकडा तांदूळावर निर्यात बंदी घालण्याचा निर्णय घेण्याआधी हे लक्षात घेणे गरजेचे आहे. देशातील काही राज्यांमध्ये कमी पावसामुळे भातशेतीचे क्षेत्र घटले आहे. चीननंतर भारत हा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ओळखला जातो. जागतिक तांदूळ व्यापारात भारताचा वाटा 40 टक्के आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला. त्यात 39.4 लाख टन बासमती तांदूळ होता. अधिकृत आकडेवारीनुसार, या कालावधीत गैर-बासमती तांदळाची निर्यात $6.11 अब्ज होती. भारताने 2021-22 मध्ये जगातील 150 हून अधिक देशांमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात केला.

एका दृष्टीक्षेपात तांदूळ निर्यातीचा प्रवास

  • 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने 21.2 दशलक्ष टन तांदूळ निर्यात केला.
  • भारताने 2021-22 मध्ये जगातील 150 हून अधिक देशांमध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यात केला.

वाढत्या किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय

तांदूळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली आहे. यापूर्वी तुकडा तांदळाच्या निर्यातीवर कोणतेही शुल्क लागत नव्हते. पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यांसारख्या प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने तांदूळ उत्पादनावर चिंता वाढली आहे. यावर्षी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. तर साखरेची वाहतूकीला मर्यादा लावल्या गेल्या.

व्यापाऱ्यांचे नुकसान होणार की नाही
निर्यात शुल्क लावण्याच्या निर्णयाचे स्वागत काही व्यापारी संघटनांकडून करण्यात आले आहे. भारतीय तांदूळ अत्यंत कमी किमतीत निर्यात होतो. निर्यात शुल्कामुळे बिगर बासमती तांदळाची निर्यात 20 ते 30 लाख टनांनी कमी होईल. त्याचबरोबर 20 टक्के निर्यात शुल्कामुळे निर्यातीतून होणाऱ्या वसुलीवर कोणताही फारसा परिणाम होणार नाही, असा दावा व्यापारी संघटनाकडून केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...