आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतवणूक मंत्र:बँक एफडीपेक्षा जास्त व्याज देतेे पोस्ट ऑफिसमधील गुंतवणूक

वेल्थ भास्कर टीम15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरबीआयने मे ते ऑगस्टदरम्यान रेपो रेट १.४०% ते ५.४०% वाढवला आहे. यामुळे बँकांमधील अतिरिक्त रोकड कमी झाली, म्हणून त्यांनी गुंतवणूकदारांना निधीसाठी आकर्षित करण्यास सुरुवात केली. त्यासाठी एफडीचे व्याजदर वाढवण्यात आले. एसबीआय फंडवर प्रतिवर्ष कमाल ५.६५% व्याज देत आहे. इतर मोठ्या बँकांचे व्याजदरदेखील ६% ते ६.१०% च्या श्रेणीत आहेत. त्या तुलनेत पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांवर वार्षिक ७.१% ते ७.६% व्याज मिळत आहे. साहजिकच, पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजना परताव्याच्या बाबतीत चांगल्या आहेत. पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करणे अधिक फायदेशीर आहे. कारण त्यातील काही योजनांचे दर दर तीन महिन्यांनी सुधारित केले जातात. याउलट, बँक एफडीचे दर निश्चित आहेत. म्हणजे, जर व्याजदर वाढत असतील तर पोस्ट ऑफिस रिटर्न दर ३ महिन्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

5 मोठ्या बँकांच्या एफडीवरील व्याजदर एसबीआय 5.65% अॅक्सिस बँक 6.05% एचडीएफसी बँक 6.10% आयसीआयसीआय 6.10% पंजाब नॅशनल बँक 6.10%

पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनांचे व्याजदर नॅशनल सेव्हिंग्ज सर्टि. 6.80% किसान विकास पत्र6.90% पब्लिक प्राॅव्हिडंट फंड 7.1% सीनियर सिटिझन से.स्कीम 7.4% सुकन्या समृद्धी अकाउंट 7.6%

पोस्ट ऑफिसच्या या तीन योजनांचा तुम्ही विचार करू शकता सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम एससीएसएसमध्ये वार्षिक ७.४० % व्याज मिळते. ते दर तीन महिन्यांनी दिले जाते. वयाच्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती एससीएसएसमध्ये खाते उघडू शकते. आयुष्यातील जोडीदारासोबतही संयुक्त खातेही उघडता येते.

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड अकाउंट-पीपीएफ यात व्याज उत्पन्न आणि योजनेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर मिळणारी रक्कम करमुक्त आहे. ७.१% व्याज वर्षातून एकदा दिले जाते. १८ पेक्षा कमी वय असलेल्या आहे. तुम्ही कोणत्याही गुंतवणूकदाराच्या नावाने पीपीएफ खाते उघडू शकता.

सुकन्या समृद्धी अकाउंट-एसएसए यामध्ये वार्षिक ७.६०% व्याज मिळते. हे खाते १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने उघडता येते. एसएसए योजनेत आर्थिक वर्षात किमान २५ रुपये आणि कमाल १.५० लाख रुपयांची गुंतवणूक करणे शक्य आहे.

बातम्या आणखी आहेत...