आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशातील फक्त 50 लोकांनी बँकांमध्ये 92,570 कोटी रुपये दडवले आहेत. अर्थ मंत्रालयाने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, देशातील टॉप 50 डिफॉल्टर्सनी बँकिंग व्यवस्थेची 92,570 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. मेहुल चौकसीची कंपनी गीतांजली रत्न ही टॉप-50 डिफॉल्टर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
गीतांजली जेम्सची 7,848 कोटींची फसवणूक
7,848 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेल्या यादीत गीतांजली जेम्सचे नाव आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ एरा इन्फ्रा (रु. 5,879 कोटी), REI ऍग्रो (रु. 4,803 कोटी), ABG शिपयार्ड (रु. 3,708 कोटी), विन्सम डायमंड्स (रु. 2,931 कोटी) आणि रोटोमॅक ग्लोबल (रु. 2,893 कोटी) यांचा क्रमांक लागतो.
10.1 लाख कोटी कर्ज माफ केले
बँकांनी 10.1 लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली आहेत. म्हणजेच हा पैसा बँकांकडे परत येण्याची शक्यता नाही. भारतातील सर्वात मोठी बँक SBI ने सर्वाधिक 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे.
या बॅंकेत बुडीत खात्यात सर्वात जास्त पैसा
बॅंक | बुडीत खात्यातील कर्ज |
SBI | 2 लाख कोटी रुपये |
PNB | 67,214 कोटी रुपये |
ICIC | 50,514 कोटी रुपये |
HDFC | 34,782 कोटी रुपये |
3 एफआयआरवर गुन्हा दाखल
6700 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने मेहुल चौकसी विरोधात तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने फरारी हिरे व्यापारी मेहुल चौकसी आणि दोन ज्वेलरी ब्रँड्सविरुद्ध तीन नवीन एफआयआर नोंदवले आहेत. नव्या घोटाळ्यात मेहुल चौकसी आणि नक्षत्र ब्रँड्स लिमिटेड आणि गीतांजली जेम्स लिमिटेडचे तक्रारीत नाव असल्याचे म्हटले आहे.
बँकेच्या वतीने सांगण्यात आले की, चौकसी आणि दोन ज्वेरली ब्रँडमुळे PNB आणि इतर अनेक बँकांचे 6,746 कोटी रुपयांचे अतिरिक्त नुकसान झाले आहे. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी चोक्सी जानेवारी 2018 मध्ये परदेशात पळून गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.