आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकिंग:चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत बँकांचा एनपीए दुप्पट हाेण्याची शक्यता

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • बँका मागील तिमाहीच्या तुलनेत या वेळी दुप्पट एनपीए रक्कम जाहीर करण्याची शक्यता

काेराेना व्हायरस महामारीचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम दिसू लागला आहे. ज्येष्ठ सरकारी अधिकारी आणि अव्वल बँकर्सच्या मते भारतीय बँकांचा एनपीए या वर्षाच्या अखेरपर्यंत दुप्पट हाेण्याची शक्यता आहे. सप्टेंबर २०१९ पर्यंत बँकांकडे जवळपास ९.३५ लाख रुपयांचे थकीत कर्ज अडकले आहे. हे बँकांच्या एकूण मालमत्तेच्या तुलनेत ९.१ टक्के आहे.

या घडामाेडींशी संबंधित अधिकाऱ्यांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत बँकांचा एनपीए वाढून ताे १८ टक्क्यांवरून २० टक्क्यांवर जाण्यावर सरकार गांभीर्याने विचार करत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या समयी २० ते २५ टक्के थकीत कर्ज डिफाॅल्ट हाेण्याचा धाेका आहे. बुडीत कर्ज वाढल्यास पतवृद्धीला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबराेबर काेराेना महामारीतून आर्थिकदृष्ट्या सावरण्यातही विलंब लागू शकताे.

ही अनिश्चितता कायम आहे. बँका मागील तिमाहीच्या तुलनेत या वेळी दुप्पट एनपीए रक्कम जाहीर करण्याची शक्यता असल्याचे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या एका वित्तीय प्रमुखाने राॅयटर्सबराेबर झालेल्या चर्चेत सांगितले. राॅयटर्सच्या अहवालानुसार आर्थिक मंत्रालयाने यावर प्रतिक्रियेस नकार दिला. 

बातम्या आणखी आहेत...