आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्राहक व कर्मचाऱ्यांचे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ व सोयीस्कर करण्यासाठी सार्वजनिक बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन उपक्रम व सुविधा सुरु केल्या आहेत. या उपक्रमांमुळे ग्राहकांना अधिक कार्यक्षम व बँकिंग व्यवहार आनंददायक होणाऱ्या अनेक सुविधा सुरू केलेल्या उपक्रमात परिकल्पित आहेत. बँकेच्या ग्राहकांच्या व अर्थव्यवस्थेच्या बदलत्या गरजांप्रमाणे तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून इच्छित बदल घडविण्याचे या बँकेचे उद्दिष्ट आहे. डिजिटल उपाययोजनांच्या द्वारे आम्ही या प्रवासात अनेक लक्षणीय बदल केले असल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी ए एस राजीव यांनी सांगितले. डिजिटल परिसंस्था निर्माण करण्यासाठी संयुक्तिक उपाययोजना केल्या असल्याचा अभिप्राय राजीव यांनी व्यक्त केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.