• Home
  • Business
  • banking; corona ; coronavirus; Due to Coronavirus, only the necessary facilities will be available in banks from today, 50% staff will remain on leave

बँकिंग / कोरोना व्हायरसमुळे आजपासून बँकांमध्ये मिळतील केवळ आवश्यक सुविधा, 50% स्टाफ सुटीवर

  • लॉकडाउन दरम्यान या बँकिंग सेवांवर काहीही परिणाम होणार नाही, तरीही गर्दी टाळा

दिव्य मराठी वेब टीम

Mar 23,2020 12:32:00 PM IST

बिझनेस डेस्क - कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. यात बँकिंग सेवा सुरू राहतील. तरीही देशभरातील बँकांनी आपल्या अत्यावश्यक नसलेल्या सेवा 23 मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया बँक एसोसिएशन (आयबीए) ने रविवारी यासंदर्भात माहिती जारी केली. यासोबतच, आयबीएने बँकांना मोजक्याच शाखा सुरू ठेवण्यास सांगितले आहे. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता केवळ 50% स्टाफवर बँकिंग व्यवहार चालणार आहेत.


ग्राहकांना केवळ याच सुविधा मिळतील...

सर्व बँकांमध्ये आता कॅश डिपॉझिट, विड्रॉल, चेक क्लिअरिंग, रेमिटेन्स आणि सरकारी व्यवहार अशा सुविधाच दिल्या जातील. या व्यतिरिक्त कुठल्याही सुविधा आणि बँकांकडून दिल्या जाणार नाहीत. उर्वरीत सर्व सेवा 23 मार्चपासून सर्व बँकांच्या शाखांमध्ये बंद केल्या जाणार आहेत. बँकिंग संघटनेने ग्राहकांना अपील केले आहे, की त्यांनी आवश्यक नसल्यास बँकिंग व्यवहार करण्यासाठी आपल्या शाखेत जाउ नये. कोरोना व्हायरसमुळे बँकांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर आणली आहे. काही बँकांनी एक दिवसाआड काम करण्याचे धोरण आखून 50 टक्के कर्मचारी रोज उपस्थित राहतील अशी व्यवस्था देखील केली आहे. अशात ग्राहकांना सहकार्य करण्याची विनंती केली जात आहे.


1 एप्रिलपासून 10 बँकांचे विलीनिकरण होणारच

केंद्रीय मंत्रिमंडळाने देशातील 10 बँकांच्या विलीनिकरणाला मंजुरी दिली आहे. 10 पब्लिक सेक्टर बँकांना मिळवून चार मोठे बँक स्थापित केले जाणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मते, बँकांच्या विलीनिकरणाची प्रक्रिया 1 पर्यंत मर्जरची प्रक्रिया पूर्ण होईल. यामध्ये पंजाब नॅशनल बँकेत ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि यूनायटेड बँकेचे मर्जर होणार आहे. या मर्जरनंतर हे देशातील दुसरे सर्वात मोठे बँक होईल. कॅनरा बँकेसोबत सिंडिकेट बँक जोडले जाणार आहे. तसेच यूनियन बँकेचे आंध्रा बँक आणि कॉरपोरेशन बँकेसोबत मर्जर केले जाईल. इंडियन बँक आणि अलाहाबाद बँकेचे विलीनिकरण सुद्धा केले जात आहे.

X