आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Banks Refuse To Lend 90 Per Cent Of Gold Price, Some Economists Warn Gold Loans Sink Due To Instability

कर्ज बुडण्याची भीती:सोने किमतीच्या 90 टक्के कर्ज देण्यास बँकांचा नकार, काही आर्थिक तज्ञही अस्थिरतेमुळे सुवर्ण कर्ज बुडण्याचा इशारा देताहेत

अँडी मुखर्जी | नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 20 टन सोन्याची गुंतवणूक करू शकले सरकार

अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेचा आणखी एक प्रयत्न अनेक बँका आणि वित्तीय संस्थांना रुचत नाही. या संस्था सोन्याच्या किमतीतील चढ-उतारामुळे एकूण किमतीच्या ९० टक्क्यांपर्यंत सुवर्ण कर्ज देण्यास तयार होत नाहीत. काही आर्थिक तज्ञही बाजाारातील अस्थिरतेमुळे त्यांना सुवर्ण कर्ज बुडण्याचीही भीती व्यक्त करत आहेत.

भारतात लोकांकडे एकूण खाणीचा आठवा हिस्सा आहे. ते अशा संकटात याचा वापर करतात. हे लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने नुकतेच सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत कर्जाची मूल्य मर्यादा ७५% वरून वाढून ९०% केली आहे. बँकेच्या घोषणेनंतर सोन्यात अस्थिरता वाढली आहे. मंगळवारी एकाच दिवसात आंतरराष्ट्रीय मूल्यात ५.७% ची घसरण आली आहे. ही घसरण गेल्या सात वर्षांत सर्वात जास्त होती. दुसऱ्या दिवशी १.३% ची उसळी घेतली. या अस्थिरतेमुळे बँक सुरक्षेच्या कमी फरकात कर्ज देण्यात तयार होत नाहीत.

२० टन सोन्याची गुंतवणूक करू शकले सरकार

भारतीयांमध्ये सोन्याची मागणी पाहता केंद्र सरकारने साॅव्हरिन गोल्ड बाँडसारख्या अनेक योजना आणल्या. मात्र, भारतीयांनी केवळ २० टन सोनेच घेतले आहे. घरांत २५ हजार टन सोने जमा आहे. अशात सरकार अन्य प्रस्तावांवर विचार करत आहे. रिझर्व्ह बँक आपल्या ६१८ टन भांडार सरकारकडे हस्तांतरित करेल. तसेच बाजार मूल्याच्या ९० टक्क्यांवर फेरखरेदी करेल.

बातम्या आणखी आहेत...