आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Basic Metals 17% Cheaper In A Month; Consolation To Vehicle, Electronics Companies

दिलासा:मूलभूत धातू एका महिन्यात 17% स्वस्त; वाहन, इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांना दिलासा

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढती महागाई आणि वाढलेले व्याजदर यामुळे वाढता त्रास यातून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅल्युमिनियम, लोह खनिज, तांबे आणि जस्त यांसारख्या मूळ धातूंच्या किमती गेल्या एका महिन्यात ८-१७ टक्क्यांनी घसरल्या आहेत. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, व्हाइट गुड्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या कंपन्यांपासून वाहनांच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे.

रशिया-युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वीच, म्हणजे जानेवारीतही काही मूलभूत धातूंच्या किमती घसरल्या आहेत. जानेवारीच्या तुलनेत मे महिन्यात अॅल्युमिनियम, लोहखनिज, तांबे आणि कथील यांच्या किमती १-१४% कमी झाल्या आहेत.

मागणीत घट, वाढत्या डॉलरचा परिणाम

केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, गेल्या काही महिन्यांत धातूंच्या किमती घसरण्याची चार प्रमुख कारणे होती :

1. धातूचा मोठा खरेदीदार चीनमध्ये लॉकडाऊनमुळे मागणीत घट

2.अमेरिकेतील व्याजदरात वाढ झाल्याने डॉलर निर्देशांकातील तेजीचा परिणाम

3.क्रूडची मागणी वाढल्यने जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदी कमजोर होते

4.एप्रिलपर्यंत तेजीनंतर अॅल्युमिनियमचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढणे

आंतरराष्ट्रीय बाजारात अशा वाढल्या आणि कमी झाल्या किमती

मूलभूत धातू जानेवारीच्या एप्रिलच्या
तुलनेते तुलनेते

अॅल्युमिनियम 5.8% 12.8%
लोह खनिज 1.0% 13.2%
तांबे 4.1% 7.7%
जस्त 8.1% 10.0%
कथील 14.4% 16.8%
निकेल 25.5% 15.3%
झिंक 4.2% 14.0%
(स्रोत: बैंक ऑफ बड़ौदा रिसर्च)

बातम्या आणखी आहेत...