आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Banks Will Be Closed For 8 Days Out Of The Remaining 14 Days Of August, Check Date Wise

चार दिवस बॅंकांचे कामकाज राहणार बंद:ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित 14 दिवसांमध्ये 8 दिवस बँका बंद राहणार, तारखेनिहाय घ्या जाणून

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

15 ऑगस्टपूर्वी बँकांना एकाचवेळी सलग सुट्या लागून आल्या होत्या. त्यात स्वातंत्र्यदिनाची देखील सुटी आली. त्यामुळे बॅंकाशी संबंधित अनेकांची कामे रखडली होती. त्यात बॅंकाशी संबंधित कामे आजच म्हणजे बुधवारी पूर्ण करा. कारण उद्यापासून (दि.18) पुन्हा चार दिवस बॅंकाच्या सुट्या राहणार आहे.

याशिवाय या महिन्याच्या उर्वरित 14 दिवसांमध्ये 8 दिवस बँका काम करणार नाहीत. तथापि, या सुट्या प्रदेशानुसार भिन्न असणार आहेत. अशा परिस्थितीत, तुमच्या भागात कोणत्या दिवशी बँका बंद राहतील ते पहा. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

दिनांकबॅंका बंद, मुख्य कारणकुठे बंद राहणार बॅंका
18जन्माष्टमीभुवनेश्वर, चेन्नई, कानपूर आणि लखनऊ
19जन्माष्टटमी (श्रावण वाद-8)/ कृष्ण जयंतीअहमदाबाद, भोपाळ, चंडीगड, चेन्नई, गंगटोक, जयपूर, जम्मू, पटना, रायपूर, रांची, शिलांग, शिमला आणि श्रीनगर
20

श्री कृष्णजनाष्टमी

हैदराबाद
21रविवारसगळीकडे
27चौथा शनिवारसगळीकडे
28रविवारसगळीकडे
29श्रीमंत शंकरदेव यांची तिथीगुवाहाटी
31गणेश चतुर्थीअहमदाबाद, बेलापुर, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, हैदराबाद, मुंबई, नागपूर आणि पणजी

गुवाहाटीमध्ये 27 ते 29 ऑगस्टपर्यंत बॅंका बंद

27 ते 29 ऑगस्ट असे सलग तीन दिवस गुवाहाटीमध्ये कोणतेही काम होणार नाही. 27 तारखेला 4 था शनिवार, 28 रविवार आणि 29 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव यांच्या पुण्यतिथीनिमित्त बँका बंद राहतील. अशा परिस्थितीत येथील लोकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते.

बातम्या आणखी आहेत...