आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यांपासून तुम्ही तुमच्या हॉलसाठी मोठा टीव्ही घेण्याची योजना आखत असाल, पण कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते टाळत असाल किंवा स्वत:साठी फोन घेण्याचा विचार करत असाल, पण जोपर्यंत हा चालेल तोपर्यंत धकवू, असा विचार करत असाल तर तुम्ही ढासळत्या जागतिक अर्थव्यवस्थेचा एक छोटासा भाग आहात, जी हळूहळू १९७० च्या “स्टॅगफ्लेशन’च्या जाळ्यात अडकत आहे. जेव्हा जग खरेदी करायचे टाळते, तेव्हा त्याला ‘स्टॅगफ्लेशन’ म्हणतात.
याचा अर्थ बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील मंदावलेली मागणी यासह सतत उच्च चलनवाढ. प्रश्न असा की, तुमची खरेदी पुढे ढकलून अर्थव्यवस्था कशी मंदावली? तुम्ही एकटेच नाही तर लाखो लोक अनेक कारणांमुळे असा विचार करत आहेत. त्यामध्ये रशिया-युक्रेन युद्धासारख्या भूराजकीय कारणांचा समावेश आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था या सापळ्यात अडकते. या आठवड्यात जागतिक बँकेनेदेखील आर्थिक मंदीची चेतावणी दिली आहे. युक्रेेन युद्धानंतर पहिल्यांदाच आर्थिक मोर्चाविषयी जागतिक बँकेने सांगितले की, ऊर्जेच्या किमती वाढल्या आहेत आणि चीनची मंदी येणाऱ्या वर्षात आर्थिक विकासात अडथळा आणू शकते. जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिस मॅल्पस यांनी सांगितले, ‘अनेक देशांना मंदीत टिकणे अवघड जाईल. २०२४ पर्यंत, जागतिक आर्थिक विकास दर २७ टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे, ती १९७६ आणि १९७९ मध्ये झालेल्या आर्थिक संकटापेक्षा दुप्पट असेल. युक्रेनमधील किरकोळ विक्री १५ महिन्यांत प्रथमच घटली.टाटा सन्सचे चेअरपर्सन एन. चंद्रशेखरन यांनीदेखील या आठवड्यात टीसीएसच्या २७व्या एजीएमला व्हर्च्युअली संबोधित करताना ‘स्टॅगफ्लेशन’विषयी चेतावणी दिली. ते म्हणाले की, टेक कंपन्यांसाठी सेमीकंडक्टरचा पुरवठा कमी करण्यापासून ते तेलाच्या चढ्या किमती आणि अनेक लहान आर्थिक कारणांमुळे केवळ जागतिक वाढच नाही तर जगातील अनेक यशस्वी कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होत आहे. याचा परिणाम टॉप कंपन्यांच्या विस्तार योजनांवर आणि अशा प्रकारे नवीन नोकऱ्यांच्या निर्मितीवरही झाला. त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खर्चावर होतो.
विशेष म्हणजे, ग्राहक वस्तू, विशेषत: महाग उत्पादने खरेदी करणे थांबवत आहेत, हे लक्षात घेऊन, अॅपलने कधीही न केलेले काम आज केले. अॅपल नेहमीच महागडे फोन विकत अाला आहे. या सोमवारी अॅपलने ‘आधी खरेदी करा, नंतर पैसे द्या’ या योजनेची घोषणा केली. याआधीच अस्तित्वात असलेल्या पेमेंट सिस्टिममध्ये मोठ्या टेक कंपन्यांचा प्रवेश म्हणजे मंदीप्रवण क्षेत्रात अधिक स्पर्धा. अॅपल मास्टरकार्डच्या नेटवर्कचा प्रयोग करेल आणि अमेरिकेत आयफोन व मॅक युजर्सना सहा आठवड्यांत चार हप्त्यांत परत करण्याची सूट देईल, त्यासाठी व्याज किंवा दुसरी फी घेतली जाणार नाही. महागड्या गॅजेट्ससाठी सात वर्षे हप्त्यांची योजना आहे. लवकरच कोणत्याही वार्षिक शुल्काशिवाय को-ब्रँडेड अॅपल क्रेडिट कार्डसह येईल.
क्रेडिट कार्डसारख्या बँकिंग उत्पादनांची ओळख करून दिल्याने, अॅपलला लोकांच्या बँक खात्यांमध्ये प्रवेश मिळेल. त्यामुळे ग्राहकांच्या कुवतीचं मूल्यमापन करण्यात मदत होईल. स्टॅगफ्लेशनच्या काळात तुम्हाला विक्री वाढवायची असेल तर माल काढण्यासाठी त्याची लहान आकारात विक्री करा. जर उत्पादनाचा आकार कमी करणे शक्य नसेल तर ते मासिक हप्त्यांत द्यायला हवे. जगातील विविध कोपऱ्यातील महागड्या कपड्यांच्या दुकानांनी ही योजना आधीच सुरू केली आहे. काही ज्वेलर्सदेखील ही योजना राबवत आहेत. काही महागड्या रेस्टॉरंट्सनी ‘ईट नाऊ पे लेटर’ योजना तयार केली आहे.
{फंडा असा की, तुमचा नफा कमी करू नका, परंतु उत्पादनाचा आकार कमी करा किंवा अधिक विक्रीसाठी सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध करून द्या.
एन. रघुरामन मॅनेजमेंट गुरू raghu@dbcorp.in
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.