आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असणारी आणि आजवर दीड करोडहून अधिक लोकांना संगणक साक्षर करणारी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलमध्ये साधारणपणे १०० जागांकरिता सॉफ्टवेअर डेव्हलपर (प्रोजेक्ट ट्रेनी) ह्या पदासाठी भरती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे. इच्छुक उमेदवारांसाठी एमकेसीएलच्या https://mkcl.org/careers ह्या वेबसाइटवर संपूर्ण प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. . सदर पदासाठी फक्त फ्रेशर्स म्हणजेच २०२२ मध्ये खालील अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत असे एमकेसीएलने म्हटले आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत २२ जून २०२२ असून पहिल्या टप्प्याची ऑनलाइन प्रवेश परीक्षा ही रविवार दि. २६ जून २०२२ रोजी सकाळी ११ ते १२:३० या वेळेत घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठीचा संपूर्ण अभ्यासक्रम तसेच मार्गदर्शन करणाऱ्या वेब लिंक्स यासुद्धा या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
या पदासाठी पहिल्या टप्प्यात यशस्वी झालेल्या उमेदवारांची पुढे दोन टप्प्यांत प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाऊन त्यानंतर ते एमकेसीएलमध्ये त्या तंत्रज्ञानात काम करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. मागील वर्षी संपूर्ण भारतातून २१,००० विद्यार्थ्यांनी ह्या पदासाठी अर्ज नोंदवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.