आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Behavior Changes Due To Being Under Surveillance At Every Moment, Hesitation Even For Normal Things: Tim Cook

संघर्ष:प्रत्येक क्षणी निगराणीमध्ये राहिल्याने वर्तनात बदल, सामान्य गोष्टींसाठीही संकोच : टिम कुक

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी प्रायव्हसीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. कुक म्हणाले, खासगीपणाचे उल्लंघन ही गोष्ट लोकांसाठी हळूहळू सामान्य होत चालली आहे. ‘टाइम’च्या शिखर संमेलनात कार्यकारी संपादक जॉन सिमन्स यांच्याशी केलेल्या चर्चेत त्यांनी आपली मते मांडली. ते म्हणाले, प्रायव्हसीचे उल्लंघन याबद्दल मला खूप चिंता वाटते. प्रत्येक क्षणी आपल्यावर निगराणी केली जात आहे, असे आपल्याला वाटले तर आपले वर्तन बदलून जाते. त्यामुळे आपली विचार करण्याची पद्धतही बदलते.कुक यांनी उपाययोजनांंवरही मत मांडले. काही उपाय केले तर प्रायव्हसी सुरक्षित ठेवता येते, असे त्यांना वाटते. म्हणूनच अॅपलला अॅमेझॉन, फेसबुक व गुगलसारख्या कंपन्यांपेक्षा वेगळी आेळख देणारी ठरते. लोकांचा खासगी डेटा खासगी राहिलेला नाही. ही गोष्ट मोठी अजब वाटते. एखादी कंपनी कोणत्या प्रकारच्या लोकांकडून खासगी डेटा घेते, हे सांगणे कठीण आहे. माझ्यासाठी मात्र हा विषय चिंतेचा आहे. एलजीबीटीवर ते म्हणाले, मी समलैंगिक आहे, हे सांगून एखाद्या किमान व्यक्तीला मदत करू शकलो तरी ही गोष्ट माझ्यासाठी अभिमानाची ठरेल, असे मला वाटले. कुक यांनी २०१४ मध्ये जगासमोर स्वत:च्या समलैंगिकतेबद्दलचा दावा स्वीकारला होता. त्याबद्दल कुक म्हणाले, समलैंगिकतेबद्दल सांगणे हे माझ्या खासगीपणाच्या मर्यादांचे उल्लंघन होते.

बातम्या आणखी आहेत...