आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून आपले बिरुद थोडक्यात गमावले. लक्झरी ब्रँड लुई व्हिटॉनचे मुख्य कार्यकारी बर्नार्ड अरनॉल्ट यांनी 185.3 अब्ज डॉलर्सच्या नेटवर्थसह मस्क यांना मागे टाकले, परंतु शेअरमधील घसरणीमुळे त्यांची नेटवर्थ काही काळानंतर खाली आली आणि नोव्हेंबरमध्ये ते पुन्हा दुसऱ्या स्थानावर आले.
फोर्ब्सनुसार, गुरुवारी सकाळी बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती $184.7 अब्ज होती. एलन मस्क यांची एकूण संपत्ती $185.4 अब्ज आहे. म्हणजेच मस्क अजूनही पहिल्या क्रमांकावर आहेत. टेस्ला शेअर्समध्ये वाढ झाल्यानंतर नोव्हेंबर 2021 मध्ये मस्क जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले. अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे सोडत त्यांनी हे स्थान मिळवले.
मस्क यांच्या एकूण संपत्तीत मोठ्या प्रमाणात घट
ट्विटर डीलनंतर एलन मस्कच्या संपत्तीत घसरण होत आहे. 8 नोव्हेंबर रोजी, मस्क यांची एकूण संपत्ती $200 बिलियनच्या खाली गेली होती. याशिवाय चीनमधील कोरोना निर्बंधांमुळेही टेस्लाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. टेस्लासाठी अमेरिकेनंतर चीन ही दुसरी मोठी बाजारपेठ आहे.
बर्नार्ड अरनॉल्ट कोण आहेत?
बर्नार्ड अरनॉल्ट यांना मॉडर्न लक्झरी फॅशन उद्योगाचे गॉडफादर मानले जाते. ते जगातील सर्वात मोठे फॅशन समूह लुई व्हिटॉन मोएट हेनेसी (LVMH) चे संस्थापक, अध्यक्ष आणि सर्वात मोठे शेअरहोल्डर आहेत. बर्नार्ड अरनॉल्टचा समूह लुई व्हिटॉन हा त्याच्या जवळच्या प्रतिस्पर्धी केरिंगपेक्षा मार्केट कॅपच्या बाबतीत जवळजवळ चारपट मोठा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.