आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी ४२ दिवसाचा सुणासुदीचा मोसम वाहनांच्या विक्रीसाठी दशकातील सर्वात चांगला काळ ठरला. ऑटोमोबाइल डीलर्सचे संघटन फाडाच्या मते, ऑक्टोबरमध्ये दोन चाकीची विक्री ५१.१०% वाढुन १५,७१,१६५ झाली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्य १०,३९८४५ दुचाकीची विक्री झाली. ऑक्टोबर २०२१च्या तुलनेत गेल्या महिन्यात कार विक्री ४०.५५% ने वाढून ३,२८,६४५ वर पोहोचली. सोमवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, उत्सवादरम्यान एकूण २८,८८,१३१ वाहनांची विक्री झाली. २०२१च्या सणासुदीच्या हंगामातील विक्रीपेक्षा हे २९% अधिक आहे. कोविडपूर्व विक्रीपेक्षा ५.८२% अधिक आहे.
येत्या काही महिन्यांत वाहनांच्या किमती वाढू शकतात : फाडा सणासुदीनंतर वाहनांच्या विक्रीत थोडी कमी होते. शिवाय बहुतांश लोक नवीन वर्षात तयार वाहनाची वाट पाहतात. खरं तर, एसयुव्ही आणि प्रीमियम कारच्या मागणीची कायम रहाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये वाढ झाल्याने व्यावसायिक वाहनांची मागणी कायम राहणार आहे. बहुतांश वाहन कंपन्या ओबीडी-२ नियमांवर चालत आहेत.
अवघ्या ४२ दिवसांत ४.५६ लाख कार विकल्या यंदा ४२ दिवसांच्या सणासुदीच्या हंगामात ४,५६,४१३ कार विकल्या गेल्या. २०२१च्या सणासुदीच्या विक्रीपेक्षा ३४.३३% जास्त आहे. २०१९ च्या याच कालावधीतील विक्रीच्या तुलनेत १८.११% जास्त आहे. यादरम्यान २१,५५,३११ दुचाकींची विक्री झाली. २०२१ पेक्षा २६.३८% जास्त आणि २०१९ पेक्षा २.२१% जास्त आहे. गेल्या १० वर्षांतील सणासुदीच्या काळात वाहन विक्रीचे सर्वोत्तम चित्र आहे.
गेल्या महिन्यात १०.४ लाख दुचाकींची विक्री श्रेणी 2022 2021 वाढ टू-व्हीलर 15,71,165 10,39,845 51.10% कार 3,28,645 2,33,822 40.55% एकूण 20,94,378 14,18,726 47.62%
सणासुदीच्या काळात सर्व श्रेणींतील सुमारे २९ लाख वाहनांची विक्री झाली श्रेणी 2022 2021 वाढ टू-व्हीलर 21,55,311 17,05,456 26.38% कार 4,56,413 3,39,780 34.33%
^ पहिल्यांदाच प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांनी जोरदार खरेदी केली. गेल्या काही वर्षांतील हा सर्वोत्तम सणांचा हंगाम आहे. नवरात्र, दिवाळी याच महिन्यात आल्याने दुचाकी विक्रीचा जोर कायम राहिला. - मनीष राज सिंघानिया, अध्यक्ष, फाडा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.