आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Beware If You Are Buying A Used Car On Loan, The Interest Will Be Higher Up To 5%| Marathi News

लोन गुरू महाग फायनान्सिंग:कर्जावर जुनी कार खरेदी करत असाल तर लक्ष द्या, 5 % पर्यंत जास्त असेल व्याज

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात सध्या वर्षाला सुमारे ४० लाख जुन्या कार विक्री होतात.पाच वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. गाड्या विक्री होत आहेत म्हणजे त्यावर कर्जही असेल. बहुतांश बँका आणि बिगर बँकिंग फायनान्सिंग कंपन्या अशा कारसाठी कर्जही देतात. बघूया ते कोणत्या अटींवर मिळते.

सर्वच जुन्या कारवर मिळत नाही कर्ज
सरकारी बँक ३ वर्षांपेक्षा जुनी नसलेल्या कारसाठीच कर्ज देतात. काही खासगी बँकांच्यो मते कर्ज चुकवेपर्यंत कार १० वर्षे जुनी होऊ नये. त्याशिवाय ग्राहकाची किमान मिळकत (जसे वार्षिक २.५ लाख) व वय २१-६५ वर्षे असायला हवे.

व्याजदर न्यू कार लोनपेक्षा अधिक असतो
साधारणपणे यूज्ड कार लोनचा व्याजदर न्यू कार लोनपेक्षा अधिक असतो. बहुतांश बँका व एनबीएफसी जुन्या कारवर ३-५% जास्त दरावर कर्ज देतात. म्हणजे एक मोठी सरकारी बँक नव्या कारसाठी जेथे ८.४५% वर कर्ज देते तेथे कार जुनी असेल तर व्याज दर ११.०५-१४.५५% असेल.

युज्ड कारसाठी किती कर्ज मिळणार ?
साधारणत: यूज्ड कारच्या किमतीच्या ७५% किंवा त्यापेक्षा कमी कर्ज मिळते. कर्ज किती द्यायचे हे बँकेवर अवलंबून आहे. काही प्रकरणात १००% फायनान्स शक्य आहे.

जुन्या कारसाठी कर्ज मिळाले नाही तर ...
पर्सनल लोन घेऊ शकता किंवा एफडीवरही लोन घेऊ शकता. याद्वारे सहज कमी दरावर कर्ज मिळू शकेल.-आदिल शेट्टी, सीईओ, बँकबाजार

बातम्या आणखी आहेत...