आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना संकटामुळे आर्थिक उत्पादन ठप्प झालेले असताना इंटरनेटद्वारे खरेदीचा जाेर वाढला आहे. यामुळे अमेरिका ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे समभाग मंगळवारी ५.२८% उसळून २,२८३.३२ डॉलरच्या विक्रमी उंचीवर पोहोचून बंद झाले. यामुळे अॅमेझॉनचे बाजार भांडवल वाढून १.१ लाख कोटी डॉलर(सुमारे ८५ लाख कोटी रु.) झाले. दुसरीकडे, कंपनीचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजोस यांची मालमत्ता एका दिवसात ६३८ कोटी डॉलर(सुमारे ४८,५०० कोटी रु.) वाढली आहे. ते १३,८०० कोटी डॉलर(१०.४९ लाख कोटी रु.)च्या एकूण संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. बेजोस यांच्याकडे अॅमेझॉनची ११.२% हिस्सेदारी आहे. अॅमेझॉन आता मायक्रोसॉफ्टनंतर जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल १.३२ लाख कोटी डॉलर(सुमारे १०० लाख कोटी रुपये) आहे.
या वर्षी आतापर्यंत अॅमेझॉनचे समभागाने २३.५७% वाढ प्राप्त केली आहे. ३१ डिसेंबर २०१९ रोजी याच्या समभागाची किंमत १,८४७.८४ डॉलर होती. हा बेंचमार्क इंडेक्स एसअँडपी ५०० च्या कामगिरीविरुद्ध आहे. हा या वर्षी १४ एप्रिलपर्यंत ११.९१% पडला आहे. एसअँडपी निर्देशांक ३१ डिसेंबर २०१९ रोजी ३२३०.७८ वर होता. १४ एप्रिलला २,८४६.०६ वर बंद झाला.
मॅकेन्झीने मुकेश अंबानी यांना मागे टाकले
जेफ बेजोस यांची घटस्फोटित पत्नी मॅकेन्झी बेजोस यांनी मालमत्ता प्रकरणात भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. मॅकेन्झी यांची अॅमेझॉनमध्ये ४% हिस्सेदारी आहे. अॅमेझॉनच्या समभागांतील वाढीसोबत त्यांच्या एकूण संपत्तीत २२६ कोटी डॉलर(सुमारे १७,१७६ कोटी रुपये) वाढ झाली आहे. त्या जवळपास ३.४४ लाख कोटी रु. संपत्तीसह जगातील १८ व्या सर्वात श्रीमंत झाल्या आहेत. दुसरीकडे, मुकेश अंबानी सुमारे ३.३० लाख कोटी रुपये संपत्तीसह १९ व्या क्रमांकावर घसरले आहेत.
समभागांतील तेजीचे कारण..
फोर्ब्जनुसार, अॅमेझॉनला टाळेबंदीदरम्यान घरी राहण्याचा नाइलाज झालेल्या लोकांकडून इंटरनेटद्वारे खरेदी वाढल्याने फायदा झाला आहे. अॅमेझॉन हजारो कामगारांची भरती करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.