आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा व्यापारावर परिणाम:मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील देशातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज अनिश्चित काळासाठी बंद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डायमंड एक्सचेंज बंद झाल्यामुळे 2500 पेक्षा जास्त लहान व्यापाऱ्यांवर होणार परिणाम

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याचा परिणामही आता हळु-हळू दिसू लागला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रात कडक निर्बंध आणि वीकेंडला लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळेच मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असलेले देशातील सर्वात मोठे डायमंड एक्सचेंज असलेले 'भारत डायमंड बोर्स'ने आपले कामकाज बंद केले आहे. भारत डायमंड बोर्सकडून सदस्यांना पाठवलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल 2021 च्या रात्री 8 वाजेपासून एक्सचेंज अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आले आहे.

वाढत्या कोरोनामुळे घेतला निर्णय

भारत डायमंड बोर्सने म्हटले की, महाराष्ट्र सरकारकडून कोव्हिड-19 संक्रमणाला आळा घालण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना पाहता, आम्ही एक्सचेंज बंद करण्याचा निर्णय घेतला. भारत डायमंड बोर्स मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये असून, हे 20 एकरमध्ये पसरलेले आहे. या एक्सचेंजमध्ये 2500 लहान-मोठे व्यापारी ट्रेडिंग करतात.

भारत डायमंड बोर्स कॉम्प्लेक्समध्ये कस्टम्स हाउस, बँक आणि इतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, जे जेम्स अँड ज्वेलरी ट्रेडशी संबंधित सेवा पुरवतात. डायमंड एक्सचेंजने सर्व सदस्यांना घरी जाण्यापूर्वी आपले चेकबुक, लॅपटॉप आणि इतर महत्वाच्या वस्तु घरी घेऊन जाण्यास सांगितले आहे.

सलग दिसऱ्या दिवशी 90,000 पेक्षा जास्त प्रकरणे आली समोर
देशात कोरोनाचा वाढता आलेख चिंतेचे कारण ठरत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 96,563 नवीन रुग्ण आढळले. 50,095 बरे झाले आणि 445 जणांनी जीव गमावला. यासोबतच अॅक्टिव्ह रुग्ण म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांची संख्या 7.84 लाख झाली आहे. यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून 30,000 पेक्षा जास्त रुग्णांची वाढ झाली आहे. अशावेळी शक्यता आहे की, आज हा आकडा 8 लाखांच्या पार होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...