आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Big Blow To Adani Group, SEBI Put A Ban On Adani Wilmar's IPO, The Issue Was To Bring Rs 4500 Crore; News And Live Updates

अदानी समूहाला मोठा धक्का:सेबीने अदानी विल्मरच्या IPO वर घातली बंदी, ग्रुप कंपनीमध्ये परकीय गुंतवणुकीची चौकशी ठरले कारण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेबीने आयपीओवर आधीही घातली होती बंदी

उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपला सेबीने मोठा धक्का दिला आहे. सेबीने अदानी ग्रुपची कंपनी असलेली अदानी विल्मरच्या आयपीओवर बंद घातली आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या विरोधात परदेशी पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट (एफपीआय) चौकशी असल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली असे सांगण्यात येत आहे. कंपनी आयपीओद्वारे 4,500 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत होती.

सेबीने आयपीओवर आधीही घातली होती बंदी
सेबीच्या नियमांनुसार, आयपीओसाठी अर्ज करणाऱ्या कोणत्याही कंपनीविरोधात जर तपास सुरु असेल, तर त्या कंपनीच्या आयपीओला 90 दिवसांपर्यंत मंजूरी दिली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे यानंतरही आयपीओ 45 दिवसांसाठी पुढे ढकलला जाऊ शकतो. सेबीने जून 2021 मध्ये कमी किमतीच्या विमान कंपनी GoFirst च्या IPO वर बंदी घातली होती. कारण त्याच्या प्रवर्तकाविरोधात चौकशी सुरू होती.

अदानी एंटरप्रायझेसचा अदानी विल्मरमध्ये 50% हिस्सा
अदानी विल्मर, अदानी एंटरप्रायजेस आणि सिंगापूरस्थित विल्मर इंटरनॅशनल यांच्यात संयुक्त उपक्रम आहे. याची स्थापना 1999 मध्ये करण्यात आली असून यामध्ये अदाणी एंटरप्रायजेसचा 50 टक्के हिस्सा आहे. कंपनी खाद्यतेल निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे. याशिवाय कंपनी बासमती तांदूळ, पीठ, मैदा, रवा, डाळी आणि बेसन यासारख्या वस्तूंची निर्मिती आणि विक्री करते. कंपनीचे बहुतेक उत्पादने फॉर्च्यून ब्रँड नावाने येतात.

देशातील सर्वात मोठी अन्न कंपनी बनण्याचे लक्ष्य
अदानी विल्मरने 2027 पर्यंत देशातील सर्वात मोठी खाद्य कंपनी बनवण्याची योजना आखली आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून आपले लक्ष्य पूर्ण करणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...