आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रोन वॉर:ड्राेनच्या माध्यमातून आकाशात राज्य करण्यासाठी अॅमेझॉन, गुगल आणि यूपीएसमध्ये मोठी स्पर्धा

नवी दिल्ली / हॅरिसन वुल्फ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेने नुकतीच अॅमेझॉनच्या ड्रोन डिलिव्हरी प्रोग्रामला मंजुरी दिली

गेल्या काही वर्षांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून यशस्वी डिलिव्हरीने हे सिद्ध केले की, आता हे केवळ तांत्रिक प्रकरण नाही. हे कशा पद्धतीने आणि कोणत्या कामात वापरले जात आहे हे जास्त महत्त्वाचे झाले आहे. काही दिवसांआधी अॅमेझॉनच्या ड्रोन डिलिव्हरी प्रोग्रामला अमेरिकेत मंजुरी मिळाली आहे. दिग्गज टेक कंपनी गुगल आणि जागतिक पुरवठा साखळी व लॉजिस्टिक्स कंपनी यूपीएसने यासंदर्भात आधी मंजुरी प्राप्त केली आहे. आता ड्रोनच्या माध्यमातून कंझ्युमर पॅकेज डिलिव्हरीमध्ये नवीन संशोधनासाठी स्पर्धा आणखी तेज होण्याची शक्यता वाढली आहे. आकाशात राज्य करण्यासाठी अॅमेझाॅन, गुगल आणि यूपीएससारख्या दिग्गज कंपन्या एकमेकांशी तीव्र स्पर्धा करत आहेत. अमेरिकी फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनकडून(एफएए) ड्रोन डिलिव्हरी सिस्टिमला मंजुरी मिळालेली अॅमेझाॅन तिसरी कंपनी आहे. कंपनी दुर्गम ग्रामीण लोकसंख्या जोडणे आणि आपली डिलिव्हरी वेळेवर करू इच्छित आहे.

अमेरिकेत ड्रोन वॉरमध्ये समाविष्ट तीन कंपन्यांकडे तांत्रिक दृष्टीने हाय रिझोल्युशन मॅपिंग, हेल्थ सेन्सर डेटा आणि अनेक विकसित केल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा सुलभतेने वापर किंवा जवळजवळ एकतर्फी दबदबा आहे. उत्पादन विकास, डिलिव्हरी आणि ग्राहकांच्या व्यवहारावर कंपनी आपली बळकट पकड ठेवते. इतरांच्या तुलनेत हे त्याचे मायलेज आहे. या पद्धतीने यूपीएसला पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये जागतिक अनुभवाचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञान आणि डिलिव्हरीच्या या तीन माेठ्या कंपन्या आकाशावर राज्य करण्यासाठी एवढ्या आतुर आधी कधीच नव्हत्या. यामध्ये ड्राेन वाॅरचे युद्ध काेण जिंकेल, हे वेळ ठरवेल. मात्र, ड्राेन डिलिव्हरीवरून एक नवी क्रांती झाली हे निश्चित. या क्षेत्रात व्यवसाय स्थापित करणे आणि वाढवण्यासाठी तीन कंपन्यांनी वेगवेगळा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ड्रोन डिलिव्हरी सर्व्हिससाठी अल्फाबेटने मालकीची विंग एव्हिएशन स्थापन केली तर यूपीएसने फ्लाइट फॉरवर्ड. हेच काम अॅमेझॉन प्राइम एअरच्या नावाने करेल. जिपलाइन व विंगकॉप्टरसारखे स्टार्टअप्स अमेरिकेबाहेर ड्रोन क्रांतीचे लीडर आहेत व युरोप व आफ्रिकेत काम करत आहेत. मात्र, अॅमेझॉन, गुगल, यूपीएस मोठ्या प्रमाणात पुरवठा प्रणालीचा भूगोल बदलण्यास तयार आहेत.

अॅमेझॉन, यूपीएसकडे नेटवर्क; गुगलला ग्राहक आधार बनवावा लागेल
ड्रोनच्या माध्यमातून सामग्रीच्या पुरवठ्याच्या क्षेत्रात सध्या अॅमेझॉन आणि यूपीएसला गुगलच्या तुलनेत वाढ मिळाली आहे. दोन्ही कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक्स नेटवर्क, स्थापित ग्राहक आणि मागणी आहे. हे गुगलकडे नाहीत. कारण, प्रत्येक उत्पादनास ग्राहक हवे आहेत, त्यामुळे गुगलला ई-कॉमर्सच्या क्षेत्रात भागीदारी करावी लागेल आणि हे अॅमेझॉन आणि यूपीएस नेटवर्कच्या बाहेर असायला हवे. मात्र, गुगलने लहान-लहान व्यावसायिकाच्या प्रयोगातून सुरुवात केली आहे. उदा. ऑस्ट्रेलियात डॉग्ज फूड, फिनलँडमध्ये बेक्ड गुड्स आणि नुकतेच अमेरिकेत किराणा. दुसरीकडे, यूपीएसही फ्लोरिडामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या गटाला औषधाचा पुरवठा सुरू केला आहे.