आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PhonePe ला मिळणार मोठी गुंतवणूक:फ्लिपकार्टचे को-फाउंडर बिन्नी बन्सल फोनपेमध्ये गुंतवणार सुमारे 1,230 कोटी रुपये

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फ्लिपकार्टचे को-फाउंडर बिन्नी बन्सल फिनटेक प्लॅटफॉर्म फोनपेमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिन्नी बन्सल यांची सुमारे 100-150 मिलियन डॉलर ( 820-1230 कोटी रुपये) गुंतवणुकीसाठी कंपनीशी बोलणी सुरू आहे. जर ही डील प्रत्यक्षात झाली, तर हा व्यवहार न्यू-एज फर्ममधील सर्वात मोठ्या वैयक्तिक गुंतवणुकीपैकी एक असेल.

आता फक्त अमाउंट फायनालाइज करणे बाकी

द इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या प्रकरणाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, आता फक्त डील फायनल व्हायची आहे. मात्र, या गुंतवणुकीसाठी बोलणी सुरू असून लवकरच हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

फोनपेने आधीच उभे केले आहेत 3,691 कोटी रुपये

फोनपेने याआधीच PE दिग्गज जनरल अटलांटिक, टायगर ग्लोबल, रिबिट कॅपिटल आणि इतर अनेकांकडून 12 अब्ज डॉलर (98.44 हजार कोटी रुपये) च्या व्हॅल्यूएशनवर प्रायमरी कॅपिटलमध्ये जवळपास 450 मिलियन डॉलर (3,691 कोटी रुपये) उभारले आहेत.

70% स्टेकसह फोनपेमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार वॉलमार्ट

वॉलमार्ट 70% स्टेकसह फोनपेमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार आहे. याशिवाय फ्लिपकार्टचे समभागधारक टायगर ग्लोबल, टेनसेंट, कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी आणि मायक्रोसॉफ्ट फोनपेमधील नवीन स्टेक खरेदी करतील अशी अपेक्षा होती. कारण फोनपेने नवीन मालकी संरचना तयार करण्याची योजना आखली होती.

फोनपे दरमहा हाताळते सुमारे 400 कोटी ट्रान्झॅक्शन्स

वॉलमार्ट इंटरनॅशनलचे सीईओ ज्युडिथ मॅकेन्ना यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, ऑनलाइन पेमेंट अॅप फोनपेद्वारे दर महिन्याला सुमारे 4 अब्ज (400 कोटी) व्यवहार होतात. फोनपे थेट UPI नेटवर्कवर गुगल पे, अमेझॉन पे आणि व्हॉट्सअप पेशी स्पर्धा करते.

फ्लिपकार्टने 2016 मध्ये केले होते फोनपेचे अधिग्रहण

फोनपेला 2016 मध्ये फ्लिपकार्टने विकत घेतले आणि बिन्नी बन्सल यांनी हा करार पूर्ण करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. रिपोर्टनुसार, बिन्नी बन्सल हेदेखील फोनपेच्या बोर्डात होते. या व्यतिरिक्त, त्यांचे फोनपेचे संस्थापक समीर निगम आणि राहुल चारी यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत.

बिन्नी बन्सल यांनी सचिन बन्सलसोबत फ्लिपकार्टची स्थापना केली होती. न्यू एज कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठीही ते ओळखले जातात. बिन्नी यांनी क्यूअरफूड, एको, एथर एनर्जी, युलु, रुपिक आणि इतर कंपन्यांतही गुंतवणूक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...