आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षानंतरची ही रंजक गोष्ट आहे. त्या काळातचे प्रसिद्ध डॉक्टर सीझर रॉसी यांच्या मनात व्यवसायाची एक आगळीवेगळी कल्पना सूचली. अर्थात तुम्ही म्हणाल की, व्यवसाय करण्याचा विचार करणे म्हणजे आगळी वेगळी कल्पना सूचने थोडी असते. मात्र, हे अगदी सत्य आहे. कारण, डॉ. रॉसी यांना बाटलीबंद शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या या व्यवसायाला सुरूवातीला हशा केला गेला. त्यांना असे वाटत होते की, भारतात आगामी काळात पाण्याचा व्यवसाय खूप यशस्वी होऊ शकतो. त्यावेळी पाण्याची उपलब्धता देखील मोठ्या प्रमाणात होती. पण शुद्ध, स्वच्छ आणि खनिजयुक्त पाणी मिळणे तसे खूपच अवघड होते. अशा स्थितीत 1965 मध्ये डॉ. सीझर रॉसी यांनी खुश्रू सनटूक नावाच्या वकिलासोबत भारतात बिसलेरी कंपनीचा मुहूर्तमेढ रोवली.
मुंबई, ठाणे येथे पहिला 'बिसलेरी वॉटर प्लांट' स्थापन केला. रॉसी यांच्या कल्पनेवर सर्वत्र हशा पिकला. कारण त्या काळात भारतात पाणी विकणे हे वेडेपणाचे लक्षण कमी नव्हते. रॉसी आणि सॅंटोक यांनी पर्वा न करता बाटली बंद पाण्याचे उत्पादन सुरू केले. त्या काळात भारताच्या आर्थिक राजधानीत पिण्याच्या पाण्याचा दर्जा अत्यंत खराब होता. अशा स्थितीत हे पाणी श्रीमंत कुटुंब आणि परदेशी पर्यटकांसाठी अमृतापेक्षा कमी नव्हते.
कंपनीने मिनरल वॉटर आणि सोडा घेऊन भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात दोन्ही उत्पादने श्रीमंतांच्या आवाक्यात मर्यादित होती. ती फक्त पंचतारांकित हॉटेल्स आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध होती. रॉसी आणि सॅंटौक यांना देखील माहित होते की त्यांना त्यांची उत्पादने मर्यादित करून यश मिळवता येणार नाही म्हणून त्यांनी बिसलेरी कंपनी विकण्याचा निर्णय घेतला.
बिसलेरी कंपनीच्या विक्रीची बातमी भारतीय व्यावसायिक जगतात वणव्यासारखी पसरली. 'पार्ले कंपनी'चे सूत्रधार 'चौहान ब्रदर्स' पर्यंत ही बातमी पोहोचताच 1969 मध्ये म्हणजेच बिसलेरी वॉटर प्लांट सुरू झाल्यानंतर 4 वर्षांनीच रमेश चौहान यांनी बिसलेरी कंपनी फक्त 4 लाख रुपयांना विकत घेतली.
अर्थात आज आपण ही गोष्ट का सांगत आहोत. असा प्रश्न सर्व वाचकांना नक्कीच पडणार आहे. याचे कारण आहे. नामांकित असलेल्या आंतरराष्ट्रीय बिसलेरी पॅकेज्ड वॉटर कंपनीत टाटा समूह भागीदारी खरेदी करू शकते. इकॉनॉमिक टाइम्सने या प्रकरणाशी संबंधित तीन अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त प्रकाशित केले आहे. या संपादनामुळे टाटा समूहाला एंट्री लेव्हल, मिड-सेगमेंट आणि प्रीमियम पॅकेज्ड वॉटर कॅटेगरीत पाय रोवता येणार आहे. टाटाला रिटेल स्टोअर्स, केमिस्ट चॅनेल आणि संस्थात्मक चॅनेलचे रेडी-टू-मार्केट नेटवर्क देखील देईल. बिसलेरीकडे मोठ्या प्रमाणात पाणी वितरणाचे नेटवर्क देखील आहे. ते हॉटेल, रेस्टॉरंट आणि विमानतळांना पाणीपुरवठा करते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.