आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Bisleri Tata Group Deal ; Why Ramesh Chauhan Selling Bisleri | Everything You Need To Know  I Latest News And Update 

मुलीने बिझनेस सांभाळण्यास नकार दिल्याने बिसलेरी विकणार:टाटा ग्रुप 7,000 कोटींना घेणार; संस्थापक म्हणाले- पैसा चॅरिटीत लावणार

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे कोल्ड ड्रिंक ब्रँड कोका-कोका कंपनींला विक्री केल्यानंतर सुमारे तीन दशकांनंतर बिसलेरी कंपनीचे मालक रमेश चौहान आपली कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडला (TCPL) विक्री करणार आहेत.

ही डील 6 हजार ते 7 हजार कोटी रुपयांना होत असल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सने एका वृत्तात दिली आहे. दरम्यान, बिसलेरी कंपनीला सांभाळण्यासाठी त्यांच्या मुलीने नकार दिल्याने त्यांनी कंपनी विक्रीचा निर्णय घेतला आहे.

व्यवसाय सांभाळण्यास उत्तराधिकारी नाही
सद्याचे कंपनीचे व्यवस्थापन दोन वर्षांसाठी सुरू राहील. रमेश चौहान यांना 82 वर्ष चालू आहे. मागील काही दिवसात त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांनी सांगितले की, बिसलेरी कंपनीच्या विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नाही. चौहान म्हणाले, मुलगी जयंतीला व्यवसायात फारसा रस नाही. बिसलेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड वॉटर कंपनी आहे.

हा फोटो जयंती चौहान यांचा असून त्या रमेश चौहान यांची मुलगी आहेत. सध्या त्या कंपनीत व्हाईस चेअरपर्सनची जबाबदारी सांभाळत आहेत.
हा फोटो जयंती चौहान यांचा असून त्या रमेश चौहान यांची मुलगी आहेत. सध्या त्या कंपनीत व्हाईस चेअरपर्सनची जबाबदारी सांभाळत आहेत.

टाटा समूह अतिशय झपाट्याने व्यवसाय वाढवेल
चौहान यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, टाटा समूह अधिक चांगल्या पद्धतीने बिसलेरी कंपनीची काळजी घेईल. त्या कंपनीला पुढे नेईल. बिसलेरी विकणे हा एक वेदनादायक निर्णय होता. मला टाटा समूहाची संस्कृती आवडते आणि त्यामुळे इतर खरेदीदार असूनही मी टाटा समूहच निवडला आहे. रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोनसह बिस्लेरी खरेदी करण्यासाठी अनेक दावेदार कंपनी खरेदीसाठी होते, असेही त्यांनी सांगितले.

चौहान सामाजिक संस्थामध्ये पैसे गुंतवणार

रमेश चौहान यांनी सांगितले आहे की, बिसलेरी कंपनीत ते मायनर भागभांडवल देखील ठेवणार नाहीत. ही कंपनी विक्री केल्यानंतर त्यांना या कंपनीत शेअर्स ठेवण्याची देखील गरज नाही. अर्थात असे त्यांना वाटत देखील नाही. त्याचबरोबर या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर त्यांना जलसंवर्धन, प्लास्टिक रिसायकलिंग यासारख्या पर्यावरण आणि धर्मादाय संस्थावर काम करायचे आहे.

FY23 मध्ये अंदाजे 220 कोटींचा नफा
चौहान म्हणाले की FY23 साठी बिसलेरी ब्रँडची उलाढाल 220 कोटी रुपयांच्या नफ्यासह 2,500 कोटी रुपयांची आहे. मार्च 2021 मध्ये संपलेल्या वर्षात, कंपनीने 1,181.7 कोटी रुपयांची विक्री आणि 95 कोटी रुपयांचा नफा नोंदवला. त्याच वेळी, मार्च 2020 ला संपलेल्या आर्थिक वर्षात, कंपनीचा महसूल 1,472 कोटी रुपये होता आणि 100 कोटी रुपयांचा नफा नोंदवला गेला.

27 वर्षांचे असताना मिनरल वॉटर विक्रीस सुरूवात

मिनरल वॉटर ब्रँड 'बिस्लेरी' भारतात लोकप्रिय करणारे रमेश चौहान यांचा जन्म 17 जून 1940 रोजी मुंबईत जयंतीलाल आणि जया चौहान यांच्या घरी झाला. त्यांचे मित्र त्यांना प्रेमाने RJC म्हणतात. त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि बिझनेस मॅनेजमेंटचे शीक्षण घेतले होते. नेहमी काळाच्या पुढे धावणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी वयाच्या 27 व्या वर्षी भारतीय बाजारपेठेत बाटलीबंद मिनरल वॉटर विक्री करण्यास सुरूवात केली.

50 वर्षांच्या कारकिर्दीत चौहान यांनी बिसलेरी भारतातील सर्वोच्च मिनरल वॉटर ब्रँड बनवला आहे.
50 वर्षांच्या कारकिर्दीत चौहान यांनी बिसलेरी भारतातील सर्वोच्च मिनरल वॉटर ब्रँड बनवला आहे.

पार्ले एक्सपोर्ट्सने 1969 मध्ये एका इटालियन व्यावसायिकाकडून बिसलेरी कंपनी विकत घेऊन भारतात मिनरल वॉटरची विक्री सुरू केली. 50 वर्षांच्या कारकिर्दीत, चौहान यांनी बिसलेरीला भारतातील मिनरल वॉटर व्यवसायात सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. चौहान यांनी वेदिका हा प्रिमियम नॅचरल मिनरल वॉटर ब्रँडही तयार केला आहे. याशिवाय त्यांनी थम्सअप, गोल्ड स्पॉट, सित्रा, माझा आणि लिम्का यांसारख्या अनेक ब्रँडचे निर्माते आहेत.

जयंती यांनी प्रोडक्ट डेव्हलेपमेंटचा अभ्यास केला
रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान यांनी शालेय शीक्षण पूर्ण केल्यानंतर उत्पादनातील विकासाचा अभ्यास करण्यासाठी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन अँड मर्चेंडाइझिंग (FIDM) मध्ये शीक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी इस्टिट्यूटो मॅरांगोनी मिलानो येथे फॅशन स्टाइलिंग शिकले. लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून त्यांनी फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचेही शीक्षण घेतले आहे.

जयंती तिच्या वडील रमेश चौहान यांच्यासमवेत
जयंती तिच्या वडील रमेश चौहान यांच्यासमवेत

24 वर्षांची असतानाच जॉईन्ड केली होती बिसलेरी
जयंती चौहान यांनी वयाच्या 24 व्या वर्षीच बिसलेरी कंपनी जॉईन केली होती. त्यांनी दिल्ली ऑफीसचा पदभार स्विकारला होता. कंपनीच्या कामात त्यांनी नूतनीकरण केले. 2011 मध्ये त्यांनी मुंबई कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. नवीन उत्पादनांच्या विकासाबरोबरच त्या जुन्या उत्पादनांच्या ऑपरेशनला सुव्यवस्थित करण्यात देखील सामील होत्या. तसेच जयंती चौहान या फोटोग्राफर असून पर्यटनांचा त्यांना आनंद आहे. सद्या त्या कंपनीच्या उपाध्यक्ष आहेत.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षानंतरची ही रंजक गोष्ट आहे. त्या काळातचे प्रसिद्ध डॉक्टर सीझर रॉसी यांच्या मनात व्यवसायाची एक आगळीवेगळी कल्पना सूचली. अर्थात तुम्ही म्हणाल की, व्यवसाय करण्याचा विचार करणे म्हणजे आगळी वेगळी कल्पना सूचने थोडी असते. मात्र, हे अगदी सत्य आहे. कारण, डॉ. रॉसी यांना बाटलीबंद शुद्ध पाणी विकण्याचा निर्णय घेतला. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...