आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिस्लेरी | पॅकेज्ड वॉटर ब्रँड {स्थापना ः १९६५ {महसूल ः २५०० कोटी (आर्थिक वर्ष २०२३चा अंदाज)
बिस्लेरीने अर्ध्या शतकापूर्वी देशात बाटलीबंद पाण्याची विक्री सुरू केली. आकर्षक टॅगलाइनसह जाहिरातींनी बाजारपेठेत स्थान निर्माण केले. बिस्लेरी या ५७ वर्षांपूर्वीच्या कंपनीचा आज भारतीय बाटलीबंद पाणी उद्योगाच्या बाजारपेठेत ६०% हिस्सा आहे. कंपनीकडे एकूण १३५ प्लँट आहेत, त्यांच्या मदतीने ती दररोज २ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी विकू शकते. पण, आता ‘बिस्लेरी’ ब्रँड टाटांचा होणार आहे. बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि टाटा कंझ्युमर यांच्यात ७ हजार कोटी रुपयांचा करार होऊ शकतो, असे मानले जात आहे. तथापि, बिस्लेरीचे मालक रमेश चौहान यांनी २०१७ मध्येही बिस्लेरी विकण्याचा निर्णय घेतला होता. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये बाटलीबंद पाण्याच्या संस्कृतीव्यतिरिक्त अर्धा लिटर पॅकेजिंगचा मार्ग दाखवणाऱ्या बिस्लेरीची कथा वाचा.
५७ वर्षांचा बिस्लेरीचा प्रवास... 1965 बिस्लेरीचा पहिला कारखाना सुरू 1969 पारलेने ४ लाखांत बिस्लेरी खरेदी केली 1991 २० लिटरच्या कॅनची सुरुवात 1993 बिस्लेरी सोडा उत्पादन बंद केले 1995 ५ रुपयांत पाणी बाटली देणे सुरू 2011 क्लब सोडाची सुरुवात केली 2012 बिस्लेरी वेदिकाची सुरुवात 2016 बिस्लेरीने चार कोल्ड लाँच केले 2017 प्रादेशिक भाषांत लेबलची सुरुवात 2018 मुंबईत व्हर्टिकल मॅन्युफॅक्चरिंग प्लँट
सुरुवात : इटलीत सुरू झाली, आधी औषध तयार करत असे बिस्लेरीची सुरुवात १९२१ मध्ये फेलिस बिस्लेरी या इटालियन व्यावसायिकाने केली होती. सुरुवातीला बिस्लेरी मलेरियाचे औषध विकायचे. फेलिसचे रोझेस हे फॅमिली डॉक्टर होते. रोझेसना व्यवसायात खूप रस होता. १९२१ मध्ये फेलिसचा मृत्यू झाला आणि बिस्लेरीची जबाबदारी डॉ. रोझेस यांच्याकडे गेली. एकेदिवशी कंपनीची सूत्रे हाती घेताना रोझेस यांनी त्यांच्या मित्राचा मुलगा खुशरू संतुक याला पाण्याच्या व्यवसायाची कल्पना सांगितली. संतुकला वकील व्हायचे होते. त्या काळात भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. येत्या काळात पाण्याचा व्यवसाय यशस्वी होऊ शकेल, असे रोझेस यांना वाटले. रोझेस यांनी खुशरूला या व्यवसायासाठी तयार केले आणि १९६५ मध्ये खुशरू संतुक यांनी ठाणे, मुंबई येथे पहिला ‘बिस्लेरी वॉटर प्लँट’ लावला.
टर्निंग पॉइंट : पारलेने बिस्लेरीला जीवदान दिले पाणी व सोडा घेऊन बिस्लेरी भारतीय बाजारपेठेत दाखल झाली. सुरुवातीच्या काळात बिस्लेरीची उत्पादने एका विशिष्ट विभागापुरती मर्यादित होती. त्यामुळेच खुशरूचा पाण्याचा व्यवसाय फारसा चालला नाही आणि त्याने तो विकण्याचा निर्णय घेतला. ही बातमी समजताच पारले कंपनीच्या ‘चौहान ब्रदर्स’च्या मालकांनी बिस्लेरी विकत घेण्याची ऑफर दिली. १९६९ मध्ये त्यांनी बिस्लेरी चार लाख रुपयांना विकत घेतली. त्या काळात भारतात सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दर्जा चांगला नव्हता. त्यामुळे लोक बळजबरीने साधा सोडा विकत घेऊन प्यायचे. हे लक्षात घेऊन पारलेने लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी वितरकांची संख्या वाढवली. आणि बिस्लेरीने भारतात पाण्याच्या बाजारपेठेचा व्यवसाय निर्माण केला.
रंजक : एकेकाळी बिस्लेरी व थम्स-अप एकच कंपनी होती १९५६ ते १९७६ पर्यंत भारतातील कोल्ड ड्रिंक मार्केट कोका कोलाकडे होते. परंतु, १९७७ मध्ये परकीय चलन कायदा लागू झाल्यानंतर कोका-कोलाने भारतात थंड पेयाचा व्यवसाय बंद केला. हा निर्णय चौहान बंधूंसाठी संधीसारखा होता. त्यांनी भारतात थम्स-अप लाँच केले. सुमारे २० वर्षाे थम्स-अपने भारतीय कोल्ड्रिंक मार्केट काबीज केले. परंतु, बिस्लेरीच्या मालकीचा कोल्ड ड्रिंक ब्रँड फ्रँचायझी मॉडेलवर अवलंबून होता आणि वितरक या मॉडेलवर खुश नव्हते. वितरण कंपनीचे मालक रमेश चौहान यांच्या नेतृत्वावरही ते नाराज होते. त्यामुळे ते कोका-कोलाकडे वळू लागले. अखेरीस १९९९ मध्ये कोका-कोलाने पारलेकडून थम्स-अप विकत घेतले.
बिस्लेरीचा चेहरा... बिस्लेरी घरोघरी नेण्याचे काम रमेश चौहान (८२ वर्षे) यांनी केले. त्यांनी लिम्का, थम्स-अप, गोल्ड-स्पॉट असे ब्रँडही निर्माण केले. मात्र, काही निर्णयांमुळे त्यांनी हे व्यवसाय विकले. सध्या बिस्लेरी मिनरल वॉटरव्यतिरिक्त हिमालयन स्प्रिंग वॉटर, फिजी ड्रिंक्स आणि हँड प्युरिफायर तयार करते. कंपनीची विक्री केल्यानंतर रमेश चौहान यांना यापुढे बिस्लेरीमध्ये कोणतीही भागीदारी ठेवायची नाही, त्यांनी इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.