आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Crypto Mining In 12 Districts Of Chhattisgarh, Bitcoin Etherium To More Than 10,000 People

केळीच्या बागेत तयार होतेय क्रिप्टोकरन्सी:छत्तीसगडमधील 12 जिल्ह्यांमध्ये क्रिप्टो मायनिंग, तरुणांनी मोठा खर्च करून उभारला सेटअप

प्रशांत गुप्ताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

क्रिप्टोकरन्सी किंवा डिजिटल चलन, सध्या जगभरात चर्चेत आहे, हे चलन आता छत्तीसगडमध्येही तयार होत आहे, म्हणजेच राज्यात या चलनाची खाण किंवा मायनिंग सुरू झाली आहे. येथे अनेक शक्तिशाली संगणकांद्वारे विशेष प्रकारची कोडी सोडवून ती तयार केली जात आहे.

दिव्य मराठी नेटवर्कच्या दोन महिन्यांच्या तपासात छत्तीसगड राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये क्रिप्टो मायनिंग होत असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग, अंबिकापूर, बिलासपूर, रायगड आणि जगदलपूर हे प्रमुख आहेत. राज्यातील 20 तरुण 30000 मेगा हॅश पॉवर निर्माण करत आहेत आणि 10-12 प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी तयार केल्या जात आहे. त्यासाठी कल्पक विचार असलेल्या तरुणांनी मोठा खर्च करून सेटअप उभारला आहे.

छत्तीसगडच्या सुखरी येथे असलेल्या क्रिप्टो मायनिंग साइट्समधील खाणकामाची माहिती देताना प्रकाश टाक.
छत्तीसगडच्या सुखरी येथे असलेल्या क्रिप्टो मायनिंग साइट्समधील खाणकामाची माहिती देताना प्रकाश टाक.

12 वी पास प्रकाश शेतामध्ये तयार करत आहेत क्रिप्टो

दिव्य मराठी नेटवर्कची टीम 2 महिन्यांपासून क्रिप्टो मायनर्सचा शोध घेत होती. रायपूरच्या लहान-मोठ्या कॉम्प्युटर दुकानदार, ग्राफिक्स कार्ड विक्रेते ते कॉम्प्युटर, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरशी बोललो. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शनिवार, 28 मे रोजी टीमने राजनांदगाव जिल्ह्यातील अर्जुनी लगतच्या सुखरी गावातील प्रकाश टाकी यांची भेट घेतली, प्रकाश केळीच्या बागेत 600 GPU बसवून क्रिप्टो मायनिंग करत आहेत.

12वी नंतर प्रकाशने 6 वर्षांपूर्वी 1 GPU सह हे काम सुरू केले. आज त्यांच्या 2 साइटवर 1,200 GPU आहेत. एकाची किंमत 1 ते 1.50 लाख रुपये आहे. प्रकाशच्या मते, 600 GPUs दरमहा 4000 मेगा हॅश पॉवर निर्माण करतात. ते आशियातील नॅनो पूल आणि मायनिंग पूलमध्ये जाते. तिथून तुम्हाला बक्षीस म्हणून इथरियम मिळेल. भारतातील कोणत्याही क्रिप्टो एक्सचेंजमध्ये ते विकल्यास, 10 मिनिटांत तुमच्या बँक खात्यात पैसे येतात.

600 GPUs दरमहा 2 Ethereum बनवतात. एकाची किंमत दीड ते दोन लाख रुपये आहे. रुसो-युक्रेन युद्धापूर्वी याची किंमत 4 लाखांहून अधिक होती. प्रकाश सांगतात की, भविष्य डिजिटल चलनाचे आहे. छत्तीसगड सरकारने मदत केल्यास, आम्ही रायपूरमध्येच ब्लॉकचेन डाटा आणि एज्युकेशन सेंटर आणि क्रिप्टो एक्सचेंज आणू शकतो. यामुळे तरुणांना ब्लॉकचेनचे शिक्षण मिळेल, रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि तरुण बाहेर जाणार नाहीत.

140 वर्षे चालणारे पहिलेच चलन बिटकॉइन

जपानचे सातोशी नाकामोटो हे क्रिप्टोचे जनक आहेत. हे डिजिटल चलन 9 जानेवारी 2009 रोजी बिटकॉइन म्हणून लाँच करण्यात आले. हे अशा प्रकारे प्रोग्राम केले गेले आहे की, ते 140 वर्षे टिकेल. त्यात 2.10 कोटी बिटकॉइन्स आहेत. प्रकाश टाके यांच्या मते, दर 10 मिनिटांनी एक ब्लॉक तयार केला जातो. 1 ब्लॉकमध्ये 50 बिटकॉइन्स रिलीझ केले जातात, दर 4 वर्षांनी या खाणीतून बिटकॉइन्स रिलीझ अर्ध्यावर येईल.

वास्तविक बिटकॉइन ही जगातील सर्वात आवडती क्रिप्टोकरन्सी आहे. त्यानंतर Ethereum, BnB, Solana, Gala, Tether, Litecoin आणि Dodgecoin यांचा क्रमांक लागतो. आज छत्तीसगडमध्ये 75 हजारांहून अधिक क्रिप्टो होल्टर्स आहेत, ज्यांच्याकडे हे चलन आहे. एका बिटकॉइनची सध्याची किंमत सुमारे 24 लाख रुपये आहे आणि त्यानंतर इथरियमचा दर 1.50 लाख रुपये आहे.

सेटअपसाठी लागतो मोठा खर्च

फक्त GPU मध्ये 6 कोटींची गुंतवणूक आहे. इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे शुल्क वेगळे. यामध्ये दरमहा 30-40 किलोवॅट वीज वापरली जाते, म्हणजेच महिन्याला एक लाख रुपये वीज बिल येते. दिवसाचे 24 तास हाय स्पीड इंटरनेट आवश्यक आहे. राज्यात सुरू असलेल्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यासाठी 3 तरुण आयटीआय डिप्लोमाधारक काम करत आहेत. या खर्चाचाही यात समावेश आहे.

एका अंदाजानुसार, 2016 ते 2020 दरम्यान छत्तीसगडमध्ये 70 हजार व्यवहार झाले आहेत.
एका अंदाजानुसार, 2016 ते 2020 दरम्यान छत्तीसगडमध्ये 70 हजार व्यवहार झाले आहेत.

असे आहे क्रिप्टोचे जग

1. क्रिप्टो चलन म्हणजे काय?

हे एक डिजिटल चलन आहे. आपण त्याला स्पर्श करू शकत नाही आणि पाहू शकत नाही. त्याचा संपूर्ण व्यवसाय ऑनलाइन केला जातो. क्रिप्टोकरन्सी व्यवहार जगभर होत आहेत, तरीही त्यात गुंतेवणूक केलेल्यांची संख्या मर्यादित आहेत. हे जाणून घेण्यासाठी, क्रिप्टो मायनिंग समजून घेणे आवश्यक आहे.

2. क्रिप्टो मायनिंग म्हणजे काय?

मोठे संगणक, एसिक मशीन, ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) शी जोडलेले असतात आणि विशेष फॉर्म्युले, अल्गोरिदम, समस्या सोडवतात आणि सोप्या भाषेत कोडी तयार करतात आणि नाणी तयार करतात. यालाच खाणकाम किंवा मायनिंग म्हणतात. यापासूनच क्रिप्टो चलन बनते.

3. त्याची बाजारपेठ कोठे आहे?

आज जगभरातील व्यवहार क्रिप्टो चलनाने होत आहेत. तुम्हीही ते दोन प्रकारे खरेदी करू शकता, महत्त्वाचे म्हणजे क्रिप्टो एक्सचेंज. त्याची जगभरात देवाणघेवाण होते. वजीरएक्स, जेबपे, क्वाइनस्विच कुबेर हे भारतातील प्रमुख एक्सचेंज आहेत, ते 24 तास खुले असतात.

अर्थव्यवस्थेचे क्रांतिकारी तंत्र: तज्ञ

ब्लॉकचेन एक डिजिटल खातेवही आहे. त्याचे व्यवहार साखळीत जोडलेल्या प्रत्येक संगणकावर दिसतात. हा क्रिप्टोकरन्सीचा कणा आहे. ब्लॉकचेन हे भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी क्रांतिकारी तंत्रज्ञान मानले जात आहे. यामध्ये इंटरनेटची क्रिप्टोग्राफी, वैयक्तिक 'की', म्हणजेच माहिती गुप्त ठेवणे आणि प्रोटोकॉल नियंत्रित करणे समाविष्ट आहे. क्रिप्टोकरन्सी व्यतिरिक्त, ब्लॉकचेन तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान, डाटा व्यवस्थापन आणि सरकारी योजनांचे लेखा, बँकिंग आणि विमा यामध्ये वापरले जाते.

-डॉ. पद्मावती श्रीवास्तव, सहयोगी प्राध्यापक, संगणक विज्ञान अभियांत्रिकी विभाग, बीआयटी, रायपूर

बातम्या आणखी आहेत...