आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Bloomberg Billionaires Index Report 2021 | Marathi News | Adani Leads In Amassing Wealth, Premji Overtakes Ambani

ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सचा अहवाल 2021:संपत्ती वाढवण्यात गौतम अदानी पुढे, अझीम प्रेमजींनी मुकेश अंबानींना मागे टाकले

मुंबई18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०२१ हे वर्ष भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्यासाठी सर्वात फायदेशीर ठरले. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अब्जाधीश गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये २०२१ मध्ये ४१५ अब्ज डाॅलर्सने (३.०९ लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. दुसऱ्या क्रमांकावर विप्रोचे अझीम प्रेमजी आहेत. ज्यांच्या संपत्तीत १५.८ अब्ज डाॅलर्स किंवा १.१७ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २०२१ मध्ये एकूण १३ अब्ज डॉलर म्हणजेच ९६.६ हजार कोटींची वाढ झाली आहे. तरीही मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अदानींच्या कमाईमध्ये त्यांच्या सूचीबद्ध कंपन्यांकडून मिळालेल्या उत्कृष्ट परताव्याचे योगदान दिले जाते. २०२१ मध्ये अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स २४५ %, अदानी ट्रान्समिशन २८८ %, अदानी टोटल गॅस ३५१% वाढले. त्याच वेळी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे १९ टक्क्यांनी वाढले.

जगातील ५०० श्रीमंतांमध्ये २० भारतीयांनी पटकावले स्थान
५०० श्रीमंतांच्या यादीत २० भारतीय आहेत. यामध्ये शिव नाडर (४५), राधाकिशन दमानी (६३), लक्ष्मी मित्तल (९०), सायरस पूनावाला (१२६), उदय कोटक (१३८), दिलीप संघवी (१४२), सावित्री जिंदाल (१६५), कुमार मंगलम बिर्ला (१८६) यांचा समावेश आहे. , सुनील मित्तल (१९५)

बातम्या आणखी आहेत...