आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • BoAt Launches New Smartwatch I Latest News And Update I It Will Show Cricket Scores I Bluetooth Calling I

BoAt ने लॉंच केली स्मार्टवॉच:ही दाखविणार क्रिकेट स्कोअर, ब्लूटूथ कॉलिंगसह 10 दिवसांपर्यंत टिकेल चार्जिंग; वैशिष्ट्ये घ्या जाणून

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

BoAt ने एक नवीन स्मार्टवॉच 'स्ट्रॉम प्रो कॉल' लॉंचॉ केली आहे. या घड्याळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते युजर्सला थेट क्रिकेट स्कोअर देखील सागणार आहे. याशिवाय, यात ब्लूटूथ कॉलिंग आणि एकदा चार्जिंग केल्यानंतर 10 दिवसांपर्यंत बॅटरी लाइफ मिळणार आहे. 700 अ‌ॅक्टिव्ह मोड्स व्यतिरिक्त यामध्ये अनेक आरोग्यविषयक सेन्सर्सचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. BoAt च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, हे नवीन घड्याळ 3,499 रुपयांना उपलब्ध आहे.

जाणून घ्या तपशील आणि घड्याळाच्या नवीन वैशिष्ट्याबद्दल

  • या घड्याळात कंपनीने 368x448 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा 2.5D वक्र डिस्प्ले 60Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. तुम्हाला घड्याळात ब्लूटूथ कॉलिंगची सुविधा देखील मिळेल. यात 368x448 पिक्सेल रिझोल्यूशनसह 1.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल.
  • यामध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी 700 हून अधिक सक्रिय मोड देण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला 24x7 हार्ट रेट सेन्सरसह SpO2 मॉनिटर आणि स्लीप मॉनिटरिंगची सुविधाही मिळेल. घड्याळात थेट क्रिकेट स्कोअर डिस्प्ले फीचर देखील आहे.
  • यामध्ये आरोग्य आणि फिटनेससाठी 700 हून अधिक सक्रिय मोड देण्यात आले आहेत.

स्मार्टवॉच 3 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध
कंपनीने हे घड्याळ तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉन्च केले आहे – ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर पर्याय. कंपनी घड्याळासोबत बदलण्यायोग्य सिलिकॉन पट्टा देखील देत आहे. कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त, तुम्ही ते फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

सिंगल चार्जमध्ये 10 दिवस चार्जिंग टिकेल
बोटचे हे नवीन घड्याळ मजबूत बॅटरीसह येते. एका चार्जवर हे घड्याळ 10 दिवस आरामात चालते, असा कंपनीचा दावा आहे. वॉचमध्ये ASAP चार्ज फीचर देखील आहे. जे 30 मिनिटांत तिची बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकते. या घड्याळात 100 पेक्षा जास्त वॉच फेस असलेले Google Fit आणि Apple Health देखील इन-बिल्ट करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...