• Home
  • Business
  • Bonuses to promote employees of many companies in the country, even after lockdown, There are no servant deductions from startups either

दिव्य मराठी विशेष / टाळेबंदीनंतरही देशात अनेक कंपन्यांचा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोनस, स्टार्टअप्सकडूनही नोकर कपात नाही

  • एशियन पेंट्स, एचसीएल व इन्फोसिससह अनेक कंपन्या नोकर कपात टाळताहेत

दिव्य मराठी

May 22,2020 09:05:00 AM IST

नवी दिल्ली. देशात टाळेबंदीचा परिणाम बहुतांश कंपन्यांवर झाला आहे. यातून सावरण्यासााठी त्या नोकर कपात आणि वेतन कपातीसारखे अनेक उपाय योजत आहेत. मात्र, यापैकी काही कंपन्या अशा आहेत, ज्या अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांसोबत उभ्या आहेत. एशियन पेंट्स, एचसीएल, इन्फोसिससह अनेक कंपन्या कपात टाळत आहेत. याऐवजी त्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आदींची घोषणा करत आहेत. यामध्ये स्टार्टअपचाही समावेश आहे. देशातील सर्वात मोठी पेंट्स उत्पादक कंपनी एशियन पेंट्स कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांचे वेतनवाढ करत आहे. कंपनी आपल्या विक्री विभागास देत असलेल्या सहकार्यात हॉस्पिटलायजेशन व विमा, पार्टनर स्टोअरसाठी निर्जंतुकीकरणाची पूर्ण सुविधा आणि थेट रोकड मदतीचा समावेश आहे. कंपनीने आपल्या काँट्रॅक्टर्सच्या खात्यात ४० कोटी रुपयेही ट्रान्सफर केले आहेत. कंपनीचे एमडी आणि सीईओ अमित सिंगले म्हणाले, आम्ही हायर आणि फायर(नोकरीवर ठेवणे आणि कपात करणे)मध्ये यावर विश्वास ठेवतो. एक परिपक्व ब्रँडच्या रूपात आम्ही आपल्या कर्मचाऱ्यांना आश्वस्त करतो की सध्याच्या स्थितीत आपण एकजूट आहाेत.

सिंगले म्हणाले, कंपनी रोकड प्रवाहाबाबत सतर्क आहे. जोवर शक्य आहे तोवर खर्च टाळता येईल. सिंगले म्हणाले, अनिश्चिततेच्या या काळात ४-५ महिने आणखी चालला तरीही कंपनीच्या स्थितीवर विशेष फरक पडणार नाही. दुसरीकडे, इन्फोसिसचे सीएफओ निलांजन रॉय म्हणाले, कंपनी कुणाची नोकरी जाऊ देणार नाही. येत्या वित्त वर्षात कंपनी ३५ हजार नव्या नोकऱ्या देईल.

बोनस १२ महिन्यांच्या निकालावर असल्याने तो देणार

हिंदुस्तान कॉम्प्युटर लिमिटेड(एचसीएल)ने सांगितले की, ते आपल्या १५००० कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करणार नाहीत. यासोबत सर्वांना गेल्या वर्षीचा बोनसही देईल. कंपनीचे मुख्य मनुष्यबळ अधिकारी आप्पारावर व्ही.व्ही. म्हणाले, बोनस गेल्या १२ महिन्यांच्या कामाचा परिणाम आहे आणि आम्ही तो पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. याआधी कंपनीने या वर्षी १५,००० फ्रेशर्सना जॉब देण्याची घोषणा केली आहे. असे असले तरी या प्रक्रियेची गती मंद होईल.X