आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:युरोपात तेजी; सेन्सेक्समध्ये 437 अंकांची वाढ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार लक्षणीय वाढीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या बड्या समभागाची जोरदार खरेदी आणि युरोप शेअर बाजारातील तेजी हे यामागे कारण होते. यापूर्वी सलग दोन दिवस शेअर बाजारात घसरण झाली होती. सेन्सेक्स ४३७ अंकांनी वाढून (०.७९%) ५५,८१८ अंकांच्या पातळीवर आणि निफ्टी १०५ अंकांनी वाढून १६,६२८ अंकांच्या पातळीवर बंद झाला. बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांक ०.६० टक्क्यांवर होता, परंतु मिड-कॅप निर्देशांकात फारशी वाढ झाली नाही. तेल आणि वायू निर्देशांकात सर्वाधिक २.१४ टक्क्यांनी वाढ झाली. तंत्रज्ञान आणि धातू निर्देशांकातदेखील अनुक्रमे १.५५ टक्के आणि ०.८८ टक्क्यांची वाढ झाली. परंतु वाहन निर्देशांकात ०.६२% आणि बँक निफ्टीमध्ये किरकोळ घसरण झाली. सेन्सेक्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एचसीएल टेक आणि टीसीएस हे आघाडीवर होते. हे समभागही वाढीसह बंद झाले.

बातम्या आणखी आहेत...