आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Boom In Real Estate | The Number Of Property related Startups Increased By Almost 700 Times

रिअल इस्टेटमधील तेजी:मालमत्तेशी संबंधित स्टार्टअप्सची संख्या तब्बल ७०० पटीने वाढली

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचा सराव वाढल्यानंतर रिअल इस्टेट आणि गृहनिर्माण कंपन्यांनी ऑनलाइन प्रॉपर्टी प्रमोशन आणि विक्रीकडे अधिक लक्ष दिले. यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित प्रॉप-टेक स्टार्टअप्सच्या संख्येत २०१६च्या तुलनेत ७०० पट वाढ झाली आहे. प्रॉपर्टी कन्सल्टंट एनारॉक द्वारे सोमवारी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०१६मध्ये, जिथे देशात फक्त २ प्रॉप-टेक तंत्रज्ञान होते, २०२२च्या अखेरीस त्यांची संख्या १४०० पेक्षा जास्त झाली आहे.

यापैकी ३०% प्री-सीड अवस्थेत असताना, ५६% प्राॅप-टेक स्टार्टअप्सना गुंतवणूकदारांकडून भरीव निधी मिळत आहे. सुमारे १४% प्राॅप-टेक स्टार्टअप्स सध्या ओळखीच्या टप्प्यात आहेत आणि लवकरच निधी उभारणीच्या टप्प्यावर जातील. देशातील एकूण बांधकामाधीन रिअल इस्टेटमध्ये गृहनिर्माण क्षेत्राचा वाटा ८४% असला तरी, सध्या केवळ ७००-८०० कंपन्यांचा वाटा १३% प्राॅप-टेक स्टार्टअप्समध्ये आहे.

भारताची स्टार्टअप इकोसिस्टम भारताची स्टार्टअप ही जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. २०१६मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रम सुरू केल्यापासून मान्यताप्राप्त स्टार्टअप्सच्या संख्येत २१ पट वाढ नोंदवली. आतापर्यंत देशात ९० हजार स्टार्टअप्सची स्थापना झाली आहे. देशातील मान्यताप्राप्त स्टार्टअपची संख्या ९०५००च्या पुढे गेली आहे जी २०१६ मध्ये फक्त ४५० होती.

५१% ऑनलाइन खरेदी ^प्रॉपर्टी टेक्नॉलॉजी स्टार्टअपची संख्या २००% सीएजीआरच्या दराने वाढत आहे. याचा फायदा ग्राहकांनाही होतो. प्रॉपर्टी शोधण्यासाठी किंवा पाहण्यासाठी त्यांना जास्त भटकावे लागत नाही. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, ९०% ग्राहक ऑनलाइन मालमत्ता शोधतात आणि ५१% ऑनलाइन खरेदी करतात. -प्रशांत ठाकूर, वरिष्ठ संचालक, एनारॉक ग्रुप

स्टार्टअप इकोसिस्टममध्ये एंटरप्राइज टेकचा वाटा 15% एंटरप्राइझ टेक १५% आरोग्य तंत्रज्ञान १०% एड टेक ०९% फिन टेक ०९% रिटेल टेक ०७% ग्राहक तंत्रज्ञान ०६% प्रॉप टेक ०६% मीडिया आणि मनोरंजन ०४% जाहिरात आणि विपणन ०४% एससीएम आणि लॉजिस्टिक्स ०३% इतर २७%

बातम्या आणखी आहेत...