आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस म्‍हणाले:आरोग्य पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारती विद्यापीठ मेडिकव्हर रुग्णालयातर्फे नवी मुंबईत नवीन रुग्णालय सुरू करण्यात आले. या रुग्णालयाचे उदघाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या उदघाटन कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, लोकसभेचे सदस्य सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, नृपाल पाटील, निरंजन डावखरे, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्‍वजीत कदम, कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कार्याध्यक्ष आनंदराव पाटील, डॉ. विलास कदम, स्वप्नाली कदम, डॉ. अस्मिता जगताप, रामशेठ ठाकूर, हरी कृष्णा, संजीव नाईक, मेडिकव्हर रूग्णालयाचे (इंडिया) अध्यक्ष आणि वैद्यकीय संचालक डॉ. अनिल कृष्णा, मेडिकव्हर ग्रुपचे ग्लोबल अध्यक्ष फेड्रीक स्टेनमो आदी मान्यवर उपस्थित होते. .

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारती विद्यापीठाने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मानव संसाधन निर्माण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे ही भारतीय विद्यापीठाची खासियत आहे. भारती विद्यापीठ आणि मेडिकव्हर च्या संयुक्त विद्यामाने एक नवीन रूग्णालय सुरू करण्यात आले आहे. या हेल्थ टुरिझमच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

बातम्या आणखी आहेत...