आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअदानी उद्योगसमूह | दहा नोंदणीकृत कंपन्यांचा बिझनेस ग्रुप {प्रारंभ ः १९८८ {मार्केट कॅप ः १०.४२ लाख कोटी रु.
सध्या शेअर बाजारात भूकंप झाला असून या भूकंपाचा केंद्रबिंदू अदानी समूह आहे. २४ जानेवारीला हिंडेनबर्ग या अमेरिकन रिसर्च कंपनीने अदानी समूहावर गंभीर आर्थिक आरोप करणारा अहवाल जारी केला होता, त्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्यांमध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली होती. आता कंपनीला अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा एफपीओही मागे घ्यावा लागला आहे. अदानी समूहाने हिंडेनबर्ग या शॉर्ट सेलिंग कंपनीचे सर्व आरोप फेटाळून लावले असून हे षड््यंत्र असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, क्रेडिट सुइसनंतर सिटी ग्रुपनेही अदानी समूहाची लँडिंग व्हॅल्यू काढून टाकली आहे. देशातील सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या अदानी समूहाची कहाणी काही कमी मनोरंजक नाही. या आठवड्याच्या ब्रँड स्टोरीमध्ये अदानी ग्रुपबद्दल जाणून घ्या.
राजीव गांधींमुळे सुरू झाला व्यावसायिक प्रवास, १९८८ मध्ये पहिली कंपनी सुरू केली राजीव गांधी यांनी त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात (१९८४-८९) आयात-निर्यात धोरण उदार केले. गौतम अदानी सांगतात की, यातूनच त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. राजीव यांनी ती पॉलिसी आणली नसती तर कदाचित ते दुसरीकडे असते. अदानी यांनी १९८६ मध्ये प्लास्टिक, धातू आणि औषधे इ.च्या निर्यात-आयातीसाठी अदानी एजन्सी आणि अदानी असोसिएट्स पार्टनरशिप कंपनीची स्थापना केली. १९८८ मध्ये अदानी एक्सपोर्ट््स लिमिटेड (एईएल) ची स्थापना झाली. ही कंपनी १९९३ मध्ये अदानी एंटरप्रायजेस लिमिटेड बनली. दरम्यान, १९९० मध्ये व्यापारासाठी गुजरातमधील मुंद्रा येथे स्वतःचे खासगी बंदर बांधले. १९९९ मध्ये अदानी यांनी विल्मारसोबत व्यवसाय सुरू केला. फॉर्च्युन नावाने २००० मध्ये मुंद्रा येथे खाद्यतेल शुद्धीकरण कारखाना सुरू केला. २००७ मध्ये अदानी टॉप १० श्रीमंत भारतीयांच्या यादीत आले. २०१४ मध्ये अदानी पॉवर देशातील सर्वात मोठी खासगी वीज उत्पादक झाली. >दहशतवादी हल्ल्यातून बचावले : गौतम अदानी यांचे १९९८ मध्ये अहमदाबादमधून खंडणीसाठी अपहरण झाले होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातूनही ते वाचले. त्या वेळी ते दुबई पोर्ट््सच्या सीईओसोबत ताज हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये डिनर करत होते.
कर्ज वाढले : बँकांचे कर्ज घटून ३०% राहिल्याचा कंपनीचा दावा क्रेडिट सुईस या युरोपच्या गुंतवणूक बँकिंग कंपनीने २०१५ मध्ये त्यांच्या ‘हाऊस ऑफ डेट’ अहवालात म्हटले की, अदानी समूह हा १० मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचा बँकिंग क्षेत्रातील कर्जाचा वाटा १२% आहे. जेफरीज इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनीच्या मते, अदानी समूहावरील एकत्रित एकूण कर्ज १.९१ लाख कोटी रुपये आहे. (२३.३१ अब्ज डाॅलर). गौतम अदानी म्हणतात की, नऊ वर्षांपूर्वी त्यांच्या समूह कंपन्यांवरील एकूण कर्जांपैकी ८६ टक्के कर्ज भारतीय बँकांचे होते, पण आता हा वाटा ३० टक्क्यांवर आला आहे. सुमारे ५० टक्के कर्ज बाँडद्वारे घेतले जाते. अदानी म्हणतात की, गेल्या नऊ वर्षांत त्यांचा नफा कर्जाच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढला आहे. कर्ज ते ईबीआयटीडीए गुणोत्तर ७.६ वरून ३.२ वर आले आहे.
मालमत्ता घटली : दहा वर्षांत तीस पट वाढ, एकतृतीयांश कमी झाली गेली तीन वर्षे अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी रोलर-कोस्टर राइड ठरली. २०२० मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत १.४९ लाख कोटी रु. वाढ झाली. १६ सप्टेंबर २०२२ ला ते १२.३ लाख कोटींच्या संपत्तीसह जगातील दुसरे सर्वात श्रीमंत झाले. सप्टेंबर महिन्यापासून त्यांचे स्थान क्रमांक दोन व तीनवर जात-येत होते. दरम्यान, त्यांच्या एकूण मार्केट कॅपमध्येही गेल्या दोन वर्षांत नऊपट वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांची एकूण संपत्ती तीन हजार टक्क्यांनी वाढली होती, पण गेल्या एका आठवड्यात गौतम अदानी यांनी एकतृतीयांश संपत्ती गमावली आहे - सुमारे ५० अब्ज डाॅलर. गुरुवारी ते ५.२७ लाख कोटी रुपयांच्या मालमत्तेसह फोर्ब्जच्या रिअल-टाइम अब्जाधीशांच्या यादीत १७ व्या क्रमांकावर आले.
व्यवसाय विस्तार : सिमेंट, तांदूळ, मीडियासारख्या क्षेत्रात अधिग्रहण अदानी समूहाने कोळसा, ऊर्जा, खाणकाम, नंतर ग्रीन एनर्जी या दिशेने व्यवसायाचा विस्तार केला. २०१८ मध्ये अदानी समूहाला देशातील ६ विमानतळांवर नियंत्रण मिळाले. यानंतर वीज वितरण, सौर ऊर्जा निर्मितीसह २०२२ मध्ये अदानी समूहाने अंबुजा सिमेंट आणि एसीसीमधील भागभांडवल विकत घेतले, त्यामुळे ते भारतातील दुसरे सर्वात मोठे सिमेंट उत्पादक झाले. एनडीटीव्ही खरेदी करण्यासोबतच त्यांनी इतर काही अधिग्रहणेही केली. अदानी समूहाच्या कंपन्यांनी मूल्यांकनाच्या बाबतीतही एअरटेल, स्टेट बँक या ब्लू चिप कंपन्यांना मागे टाकले होते. २०२२ मध्ये सर्व बीएसई कंपन्यांचे मार्केट कॅप १२.७४ ट्रिलियनने वाढले. यात अदानी समूहाच्या लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप १०.०५ ट्रिलियनने वाढले.
अदानी समूहाचे साम्राज्य : पाच व्हर्टिकलमध्ये पसरलेले २१ पेक्षा जास्त व्यवसाय, १० लिस्टेड कंपन्या १) अदानी एंटरप्रायझेस लि. समूहातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी नोंदणीकृत कंपनी. ती खाणकाम, कोळसा व्यापार, खाद्यतेल, संरक्षण, नैसर्गिक संसाधने, एरोस्पेस, विमानतळ डेटा सेंटर इ. क्षेत्रांत आहे.
२) ऊर्जा आणि उपयुक्तता या व्हर्टिकलमध्ये चार नोंदणीकृत कंपन्या आहेत - ग्रीन एनर्जी, ट्रान्समिशन, टोटल गॅस लिमिटेड, अदानी पॉवर. अदानी न्यू इंडस्ट्रीज आणि अदानी कोनेक्स लिस्टेड नाहीत.
३) वाहतूक आणि लॉजिस्टिक यामध्ये अदानी पोर्ट््स व स्पेशल इकॉनॉमिक झोन ही लिस्टेड कंपनी आहे. नॉन-लिस्टेड कंपन्या नॉर्थ क्वीन्सलँड एक्सपोर्ट टर्मिनल, अदानी एअरपोर्ट होल्डिंग व अदानी रोड्स ट्रान्सपोर्ट आहेत.
४) ग्राहकांशी थेट जोडलेल्या एफएमसीजी कंपनी अदानी विल्मार या यादीत आहे. खाद्यतेलामध्ये आघाडीवर असलेली ही कंपनी देशातील टॉप १० एफएमसीजी कंपन्यांत आहे. यादीत नसलेल्यांत अदानी डिजिटल लि. आहे.
५) इतर व्यवसाय यात अंबुजा सिमेंट्स लिमिटेड व एसीसी लिमिटेड नोंदणीकृत कंपन्या आहेत. नॉन-लिस्टेडमध्ये रिअल इस्टेट, वित्तीय सेवा, गृहनिर्माण वित्त व अर्धा डझन विशेष व्यवसाय आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.