आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाटा | पादत्राणे कंपनी {स्थापना- १८९४ {बाजारमूल्य (भारतात)- १८ हजार काेटी रु.
‘मेरा जूता है जापानी, ये पतलून इंग्लिश्तानी...’ हे राज कपूरच्या आवारा (१९५१) चित्रपटातील गाणे त्या वेळच्या भारताची सत्यकथा सांगत होते. त्या काळात पादत्राणे उद्योगावर जपानचे वर्चस्व होते. ती भारतात तयार हाेत नव्हती. अशा काळात विदेशी कंपन्यांना भारतात उदयोन्मुख बाजारपेठ दिसली. बाटा ही युरोपियन कंपनीही त्यातलीच एक होती. कालांतराने बाटा भारतीय वातावरणात वाढली आणि आज ती भारतातील सर्वात मोठी पादत्राणे विक्रेती आहे. भारतातील पादत्राणांच्या बाजारपेठेपैकी सुमारे ३५% वाटा बाटाकडे आहे. तथापि, बाजारमूल्याच्या बाबतीत बाटा जगातील पादत्राणे कंपन्यांमध्ये १२ व्या क्रमांकावर आहे. या १२९ वर्षे जुन्या कंपनीच्या यशाचे रहस्य ब्रँड स्टोरीमध्ये जाणून घेऊ...
इतिहास : दिवाळखोरही झाली, दोनदा मुख्यालय बदललेे
बाटा कंपनीची स्थापना थॉमस, अॅना आणि अँटोनिन या तीन भावंडांनी २१ सप्टेंबर १९८४ रोजी झेक प्रजासत्ताकमधील जलिन शहरात केली. बाटा घराण्याकडे पिढ्यान््पिढ्या मोचीचे काम होते. त्या वेळी पादत्राणांमध्ये फक्त चामड्याचा वापर केला जात होता, थॉमस बाटा यांनी चामड्यापासून पादत्राणे बनवण्यास सुरुवात केली, परंतु नंतर पैशांच्या कमतरतेमुळे थॉमसने प्रथमच त्यात कॅन्व्हासचा वापर केला. यामुळे कंपनीला लोकप्रियता मिळाली. ‘दा बातोव्का’ हा पहिला बूट बाजारात आला. थॉमसने कंपनीचा विस्तार करण्यासाठी कर्ज घेतले, परंतु नफा टिकला नाही. अशा स्थितीत कंपनी दिवाळखोरीत निघाली. थॉमस आणि त्याचे भागीदार इंग्लंडमध्ये आले आणि येथील एका पादत्राणे कंपनीत सहा महिने काम करून त्यांचे विपणन तंत्र शिकले आणि कंपनीची पुनर्बांधणी करण्यासाठी परतले.
- बाटाने आपल्या इतिहासात दोनदा मुख्यालय बदलले आहे. झेकोस्लोव्हाकियानंतर थॉमस यांनी १९६४ मध्ये कॅनडामध्ये मुख्यालय केले. २००४ पासून कंपनीचे मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये आहे.
भारतात बाटा : काेलकात्यात सुरू केला पहिला कारखाना
बाटा समूहाने आपल्या व्यवसायाची तीन श्रेणींमध्ये विभागणी केली आहे. बाटा, बाटा इंडस्ट्रियल आणि एडब्ल्यू लॅब (क्रीडा शैली). बाटा २० पेक्षा जास्त ब्रँड आणि लेबल्ससह जगभरात व्यवसाय करते. १९३० मध्येच बाटा भारतात आले होते. त्यानंतर थॉमस बाटा कच्च्या मालाच्या शोधात भारतात आले. भारतातील लोक गरिबीमुळे पादत्राणे घालत नाहीत, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. त्यामुळे त्यांना भारतात चपलांची मोठी बाजारपेठ दिसली. १९३१ मध्ये त्यांनी कोन्नानगर, कलकत्ता येथे एक कारखाना सुरू केला, त्याचे नाव बाटा शू कंपनी ठेवले. बाटाचा हा आशियातील सर्वात मोठा बूट कारखाना होता. त्यानंतर कोन्नानगर येथील बाटानगरपर्यंत स्थिरावला. भारतात प्रथमच त्यांनी रबर आणि कॅन्व्हास शूजचे उत्पादन सुरू केले. १९७३ मध्ये बाटा इंडिया लिमिटेड ही सार्वजनिक (पब्लिक लिमिटेड) कंपनी झाली.
- बाटा समूहाच्या मूळ कंपनीचे नाव बाटा शू ऑर्गनायझेशन (बीएसओ) आहे. बाटा इंडियात प्रवर्तक समूहाचे ५०.१६% शेअर्स आहेत. कंपनीची भारतातील गतवर्षीची विक्री २३८७ कोटी रु. होती.
मनोरंजक : ‘बाटा’ हे छोटे नाव, म्हणून मिळाली लोकप्रियता
जगातील अनेक प्रतिष्ठित एमबीए अभ्यासक्रमांमध्ये ‘बाटा ग्राेथ स्ट्रॅटेजी’ शिकवली जाते. पहिल्या महायुद्धाच्या वेळी, जिथे अनेक कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर होत्या, त्या वेळी बाटाने आपल्या चपलांच्या किमती कमी केल्या. त्यामुळे मागणी एवढी वाढली की बाटाला दहापट कर्मचाऱ्यांची भरती करावी लागली. बाटा ही अायएसअाे-९००१ प्रमाणपत्र मिळवणारी भारतातील पहिली पादत्राणे निर्माती कंपनी ठरली. बाटा इंडियाच्या ब्रँड स्ट्रॅटेजीशी संबंधित हरीश बिजूर सांगतात की, बाटाच्या लोकप्रियतेचे कारण त्याचे नाव आहे. दोन अक्षरांचे छोटे नाव ‘बाटा’ भारतीयांच्या जिभेवर झळकले, देशी नाव ऐकून लोकांना तो स्वदेशी ब्रँड वाटला. याशिवाय रंजक जाहिरातींच्या माध्यमातून बाटाने बाजारपेठेत स्थान निर्माण केले. हरीश सांगतात की, कंपनीने भारतीय ग्राहकांना आणि येथील वातावरणाला साजेसे बूट व पादत्राणे बनवण्यावर भर दिला.
- जगातील सर्वात मोठे बूट उत्पादक व विक्रेता म्हणून २००४ मध्ये बाटाचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले. बाटाच्या विविध पादत्राणांचे कॅनडातील टाेरांटाेत म्युझियम उभारण्यात अाले.
७० देशांत पादत्राणे विकते बाटा २१ उत्पादनांची जगभरात विक्री १५ काेटी पादत्राणांची वर्षभरात विक्री ५३०० जगभरात विक्री केंद्रे १३७५ किरकाेळ विक्री केंद्रे भारतात ३२ हजारहून अधिक कर्मचारी २० हून अधिक ब्रँड नेमसह विक्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.