आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्‍य मराठी विश्‍लेषण:आयटी कंपन्यांच्या गतीला ब्रेक; 6 टक्क्यांनी कमी होऊ शकते वाढ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सलग दोन वर्षांपासून बंपर नफा आणि भरमसाट पगारवाढीनंतर भारतीय आयटी क्षेत्राचा वेग आता मंदावू शकतो. यांची वाढ कमीत कमी ६ टक्के कमी होण्याचा अंदाज आहे. अमेरिका आणि युरोपात मंदावलेली अर्थव्यवस्था आणि मंदीसारखी परिस्थिती याचे कारण ठरेल. खरे तर, विश्लेषकांच्या मते, कंपन्यांवर वाढत्या पगाराच्या खर्चाचे ओझे आणि कर्मचाऱ्यांचे नोकरी सोडणे कमी होऊ शकते. आर्थिक वर्षात २०२१-२२ मध्ये देशांतर्गत क्षेत्राचे उत्पन्न १९ टक्के वाढले होते. मात्र क्रिसिलच्या एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्ष म्हणजेच २०२२-२३ मध्ये ही वाढ कमी होऊन १२-१३ टक्के राहण्याचा अंदाज आहे. पुढच्या आर्थिक वर्षात ही वाढ आणखी कमी होऊन फक्त ९-१०% राहु शकते. खरे तर, टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रोसारख्या मोठ्या आयटी कंपन्यांच्या उत्पन्नात सर्वात जास्त ८०-९०% भागीदारी अमेरिका आणि युरोपाची होते. मात्र या देशात विक्रमी महागाई आणि वाढते व्याजदर असताना मंदी दार ठाेठावताे. काॅर्पोरेट क्षेत्र खर्चात कपात करत आहे, त्यात आयटीचा खर्च जोडलेला असतो.

जीडीपीत घसरण ओसवालच्या अहवालानुसार, आयटी कंपन्या अमेरिका आणि युरोपातून कमाई करतात. दोन्ही बाजार आर्थिक अडचणीचा सामना करत आहेत. यांचे सकल देशांतर्गत उत्पादनात घसरण सुरू होऊ शकते.

दोन वर्षात आयटी क्षेत्राची जोरदार कमाई कंपनी टीसीएस इन्फोसिस विप्रो उत्पन्न 3,55,931 2,22,113 1,41,036 पगार 1,99,368 1,19,527 78,245 नफा 71,011 41,569 ‌23,093 (आकडे 2020-21 आणि 2021-22 एकूण )

बातम्या आणखी आहेत...