आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Breaking News Live Updates, Security Forces terrorist Encounter In Shopian, Firing Continued Since Night

जम्मू-काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा:शोपियानमध्ये सुरक्षा दल-दहशतवाद्यांमध्ये चकमक; रात्रीपासून गोळीबार सुरूच

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले आहेत. शोपियानमधील द्राच भागात मंगळवारी रात्रीपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर शोपियानच्या मुलू भागात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा 1 दहशतवादी मारला गेला. अजूनही मुलू भागात चकमक सुरूच आहे.

द्राच भागात मारल्या गेलेले दोन दहशतवादी हनान बिन याकूब आणि जमशेद यांचा समावेश आहे. या दोघांचा पुलवामामधील पिंगलना येथे 10 ऑक्टोबर रोजी एसपीओ जावेद दार आणि 24 सप्टेंबर रोजी पुलवामा येथे झालेल्या पश्चिम बंगालमधील मजुराच्या हत्येमध्ये यांचा सहभाग होता. पोलिसांनी सांगितले की, द्राचमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी टीमवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तर देताना दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...