आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • BSE Chitra Ramkrushanan Scam | Marathi News | BSE Marathi News | Scam 2014: The Possibility Of A Bigger Scam In The Stock Market Than Harshad Mehta

आताशी पहिला पर्दाफाश, अब्जावधींचा खेळ:स्कॅम 2014 : शेअर बाजारामध्ये हर्षद मेहतापेक्षा मोठ्या घोटाळ्याची शक्यता

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला चांगलेच आठवत असेल की, १९९० च्या दशकात सुमारे ४ हजार कोटी रुपयांच्या हर्षद मेहता कांडाने शेअर मार्केटचा पायाच हादरवून टाकला होता. आता ताजे प्रकरण नॅशनल स्टॉक एक्स्चेंजशी (एनएसई) निगडित आहे. हा हर्षद मेहता कांडापेक्षाही मोठा घोटाळा पुढे येऊ शकतो. को-लोकेशन सुविधेत गडबड करत हा घोटाळा केला गेला. प्रामुख्याने ही स्टॉक एक्स्चेंज सर्व्हरच्या अगदी जवळची जागा असते. जेथे आपली यंत्रणा लावून व्यवहार करण्यासाठी ब्रोकर्स जादा शुल्कही अदा करतात. परंतु याचा फायदा असा की, सर्व्हरच्या अधिक जवळ असल्याने ब्रोकर्सला लॅटेंसी (ऑर्डरनंतर पूर्ण होण्यास लागणारा वेळ) वाढतेे. म्हणजे दुसऱ्या ब्रोकर्सच्या तुलनेत त्यांना काही सेकंद आधीच डेटा मिळतो. अशावेळी त्यांनी सर्वात आधी ऑर्डर प्लेस करून अब्जावधीचा नफा कमावला. सीबीआई तपासानुसार मुताबिक, या घोटाळ्यात ओपीजी सिक्योरिटीज नावाच्या ब्रोकरेज फर्मला लाभ पोहोचवण्यासाठी त्याला को-लोकेशन सुविधेचे अॅक्सेस दिले गेले होते.

सर्वात आधी तक्रार केव्हा आली होती?

२०१४ मध्ये एका खबऱ्याने सेबीकडे तक्रार केली होती की, काही ब्रोकर्सनी एनएसईच्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून को-लोकेशन फॅसिलिटीचा दुरुपयोग केला आहे.एनएसईच्या तत्कालीन सीईओ चित्रा रामकृष्ण यांचे नाव का येत आहे?चित्रा २०१३ ते २०१६ पर्यंत एनएसईच्या सीईओ आणि एमडी होत्या. २०१३ मध्ये सीईओ झाल्या. त्याच वेळी एनएसईने ओपीजी आणि इतरांना को-लोकेशन फॅसिलिटीचा अॅक्सेस दिला होता. २०१६ मध्ये त्यांना पदाचा चुकीचा वापर केल्यानंतर एनएसईमधून काढून टाकण्यात आले होते.

घोटाळ्यात ‘अदृश्य बाबा’ कुठून आला?
चित्रा यांनी सेबीच्या चौकशीत सांगितले की, हिमालयातील ‘अदृश्य बाबा’च्या निर्देशांनुसार आपण अनेक निर्णय घेतले. सुमारे २० वर्षांपूर्वी हिमालयात गंगा नदीच्या किनाऱ्यावर आपण त्यांना भेटलो होतो. कोणत्या कर्मचाऱ्याला किती रेटिंग द्यायचे, कोणाला प्रमोशन द्यायचे हे चित्रा ई-मेलद्वारे बाबाला विचारत असत. एनएसईची महत्त्वाची माहितीही बाबाशी शेअर करत होत्या.

आनंद सुब्रमण्यन संशयाच्या कक्षेत कसा आला?
२०१३ मध्ये चित्रा यांनी आनंदला सीओओ बनवले, तेव्हा त्याला शेअर बाजाराचा कुठलाही अनुभव नव्हता. त्याचे वार्षिक वेतन १५ लाखांवरून थेट १.३८ कोटी रुपये करण्यात आले. नंतर जीओओचे पद देऊन वेतन ४ कोटी रुपये करण्यात आले.

सीबीआय केव्हापासून चौकशी करत आहे? ४ वर्षांनंतर पहिले यश मिळाल्यानंतर पुढे काय? २०१८ पासून चौकशी करत आहे. या घोटाळ्यात अटक झालेली पहिली व्यक्ती सुब्रमण्यन ठरला आहे. चेन्नईत ४ दिवसांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली. ६ मार्चपर्यंत तो कोठडीत राहील. अनेक मोठ्या चेहऱ्यांचा पर्दाफाश होईल, अब्जावधी रुपयांचा घोटाळा उघड होईल, अशी सीबीआयला अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...