आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्स आणि इन्फाेसिसला फटका:बीएसई, निफ्टी निर्देशांकात सलग चौथ्या दिवशी घसरण

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील महागाईची आकडेवारी लवकरच जाहीर होणार असून त्यावर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या कडक व्याज धाेरणाची भूमिका ठरणार आहे. त्यामुळे ही आकडेवारी जाहीर होण्याच्या आधी भांडवल बाजारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेत मर्यादित व्यवहार केले. बाजारात झालेल्या विक्रीच्या माऱ्यात रिलायन्स आणि इन्फाेसिसला फटका बसला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग चौथ्या दिवशी घसरणीचा कल कायम ठेवला.

परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांची अखंड विक्री आणि क्रूडच्या किमतीत झालेली झेप याचाही बाजारावर परिणाम झाला, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे सकाळच्या सत्रात भक्कम सुरुवात होऊनही मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ही गती कायम ठेवू शकला नाही आणि २७६.४६ अंकांच्या घसरणीची नोंद करत ५४,०८८.३९ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

दिवसभरात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८४५.५५ अंकांची घसरण होऊन ५३,५१९.३० पर्यंत खाली आला होता. निफ्टी ७२.९५ अंकांनी घसरून १६,१६७.१० अंकांच्या पातळीवर बंद झाला.

बातम्या आणखी आहेत...