आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सलग पाचव्या दिवशीही शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 1158 अंकांनी घसरून 52,930 वर बंद

4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग पाचव्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजारातील (BSE) सेन्सेक्स 1158.08 अंकांनी किंवा 2.14% घसरून 52,930.31 वर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील (NSE) निफ्टी देखील 359.10 किंवा 2.22% अंकांनी घसरून 15,808.90 वर बंद झाला. सर्वात मोठी घसरण बँकिंग समभागांमध्ये दिसून येत आहे.

व्यवहाराच्या सुरूवातीला मुंबई शेअर बाजारातील (बीएसई) सेन्सेक्स 480 अंकांनी घसरून 53,608.35 या पातळीवर उघडला होता. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी देखील 181 अंकांच्या घसरणीसह 15,935.20 च्या पातळीवर उघडला.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्येही घसरण
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही घसरले. मिडकॅप निर्देशांक 495.84 अंकांनी किंवा 2.24% घसरून 21,645.13 वर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांक 500.41 अंकांनी किंवा 1.96% घसरून 24,995.51 वर बंद झाला. मिडकॅपमध्ये 15.61% ची सर्वात मोठी घसरण व्हीनस रेमेडीजमध्ये दिसून आली.

बाजारातील घसरणीची कारणे
बाजारातील घसरणीमागे अनेक कारणे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. यात कोरोना संसर्गामुळे लागलेले लॉकडाऊन, वाढती महागाई, रशिया-युक्रेन युद्ध, पामतेल आयात थांबवणे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती या कारणांचा समावेश आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले की, रुपयामध्ये आलेली कमजोरी आणि कोरोनामुळे चीनमध्ये कडक लॉकडाऊन यामुळे बाजाराची चिंता वाढली आहे.

एलआयसीचे समभाग वाटप
LIC चा IPO गुंतवणुकीसाठी 9 मे पर्यंत खुला होता. आता IPO बंद झाल्यानंतर शेअर्सचे वाटप आज म्हणजेच 12 मे रोजी होत आहे. म्हणजे आज तुम्हाला कळेल की IPO मध्ये शेअर्स मिळाले आहेत की नाही. यानंतर, LIC IPO 17 मे रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध होतील.

रुपया सर्वकालीन नीचांकावर
आज भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत नवा नीचांक गाठला आहे. रुपया आज 27 पैशांनी कमजोर होऊन 77.17 वर उघडला आणि 52 पैशांनी कमजोर होऊन 77.42 वर पोहोचला. तज्ज्ञांच्या मते, जागतिक शेअर बाजारातील घसरण आणि चलनवाढीचा परिणाम रुपयावर दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...